Ticker

6/recent/ticker-posts

५०० वर्ग फूट कर माफीसाठी अकोल्याच्या नागरिकावर अन्याय का?

५०० वर्ग फूट कर माफीसाठी अकोल्याच्या नागरिकावर अन्याय का?


अकोला
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील 500 वर्ग फूट आतापर्यंतच्या मालमत्तांना कर्जमाफीची घोषणा केली या घोषणेला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इशारा दिला आहे मुंबई महानगरपालिकेत लागू असलेली ही कर्जमाफी राज्याची सर्व महानगरपालिका अकोला सह शहरासाठी का नाही असा सवाल अकोला जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने यांनी केला आहे.


राज्यातील पन्नास फुटी वर्गाच्या कर माफी संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शहर विकास विभागाच्या बैठकीत ही गोष्ट केली मुंबई महानगरपालिकेतील  सोळा लाख घरांना याचा लाभ होणार असून सांगण्यात आला आहे 2017 मध्ये दिलेली  वचनपूर्ती 2022 ला केली आहे . तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये हेक्टर मदत देण्याचे वचन 2019 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते त्याची सुद्धा पूर्तता करण्यात यावी. तसेच अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना शासनाने अनुदान देऊन या निर्णयाचा लाभ प्राप्त करून द्यावा जेणेकरून अकोल्यातील 30000 घरांना याचा लाभ होणार आहे यासाठी राज्य शासनाने त्वरित पावले उचलावी व मुंबई व अकोल्यात भेदभाव का करण्यात येत आहे अकोल्याच्या नागरिकावर अन्याय का असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे.तसेच शेतकऱ्यांना सुद्धा मदतीचा हात द्यावा महाविकासआघाडी आल्यानंतर शेतकरी संकटातून सापडलेला आहे नैसर्गिक आपत्ती वर आपत्ती संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे.दिलेला शब्दांना जगणार असे मुख्यमंत्री सांगतात तर हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच अकोल्यातील महानगरपालिकेला अनुदान देऊन 500 वर्ग फूट मालमत्ता कर दारांना कर माफी देऊन मोठेपण दाखवणार काय किंवा मुंबईवर प्रेम करणार का असाही सवाल भाजप नेत्यांनी केला आहे माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आठवण केल्यानंतर मुंबईला नाही विदर्भावर अन्याय ही कृती शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची निंदनीय असल्याचे ही भाजप नेत्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या