अकोला मधे ठिकठिकाणी क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांची जयंती
भारतीय जनता पार्टी अकोला महानगर तर्फे क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांची जयंती
अकोला सामाजिक दायित्व, समरसता, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक परिस्थिती विकट असताना समाज सुधारणेच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले यांनी दिशादर्शक कार्य केले आहे त्यांना अभिवादन करणे व बहुजन समाजाला शिक्षण शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊन बहुजनांचा विकासाचा मार्ग सुकर केला असे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी अकोला महानगर तर्फे क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते
खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार गोवर्धनजी शर्मा,आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री रणधीरभाऊ सावरकर,आमदार वसंतभाऊ खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ अर्चना ताई मसने,श्री अनुपभाऊ धोत्रे, उपमहापौर श्री राजेंद्र गिरी, सभापती श्री संजय बडोने,ओबीसी आघाडी अध्यक्ष श्री जयंतराव मसने,श्री रामप्रकाशजी मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू पार्क येथे क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत मातृ शक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अकोला पूर्व चे आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर यांनी महात्मा जोतीराव फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या संबधी माहीती अवगत करून दिली.
या कार्यक्रमाला श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, माधव मानकर, संजय गोडा, संजय गोटफोडे, ऍड देवाशीष काकड, संतोष पांडे, निलेश निनोरे, अमोल गोगे, उमेश गुजर, रामदास खंडारे, प्रकाश दाते, ज्ञानेश्वर बोदडे,उमेश मसने,अश्विनीताई हातवळने, सुमनताई गावंडे, चंदाताई शर्मा,संगीता अढाऊ, योगीता पावसाळे, जान्हवी डोंगरे, रंजना विंचनकर,मंगला सोनोने, सारिका जयस्वाल, साधना येवले, स्मिता कायंदे,मनीषा भुसारी, सारिका देशमुख, प्रणिता समरीतकर, संध्या लोकपुरे,दुर्गा भड,सविता बंड,संध्या देशकर,डॉ स्नेहलता नंदरधने, माधुरी दाते,नीलिमा उगले,गिरीष जोशी,अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ ताले,प्रशांत अवचार, तुषार भिरड,धनंजय धबाले,मिलिंद राऊत, गणेश पावसाळे,प्रकाश घोगलिया, निखिल बैस, बाळू सोनोने,सुनील उंबरकर, रवींद्र भन्साली, जस्मित ओबेरॉय, शितल जैन, प्रफुल्ल कांनकिरड, मनीष बुंदेले, मनोज साहू, रमेश करिहार, सचिन देशमुख,महेंद्र राजपूत, विक्की ठाकूर, कृष्णा पांडे, रवी शुक्ला,शाम विंचनकर, संजय तिकांडे, उकडराव सोनोने, राजकुमार शर्मा, रघुवीर देशपांडे,संदीप शेगोकार,दिलीप मिश्रा, हेमंत शर्मा, सुनील बाठे,अमोल मोहोकार, सतीश येवले, महेंद्र कायंदे, नितीन राऊत, विशाल गमे,हेमेन्द्र सुनालीवाल,आदी महानगर व मंडळ पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा मोर्चा उपस्थित होते
खेंडकर ज्ञानगंगा मधे विद्येची देवता क्रांतीज्योती सावीत्रिबाई फुले जयंती
अकोला :-
स्थानीक सरस्वती नगर, जुना वशीम बायपास, अकोला येथील विष्णुपंत खेंडकर विद्यालय, स्व. यमुनाबाई खेंडकर म. प्रा. शाळा, व स्व. नारायणराव खेंडकर काँव्हेंट येथे आज तुर्तास कोरोना संकटाचे सावट असल्यामुळे शालेय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होऊन विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावीबाई फुले यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. खेंडकर विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. अध्यक्षस्थानी विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. निलेश खेंडकर उपस्थीत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्व. यमुनाबाई खेंडकर प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मा. अल्केश खेंडकर यांची प्राथनीय उपस्थीती होती. यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीयोती सार्वत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पन करुण उपस्थितांनी अभिवादन केले तसेच अध्यक्षंनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सार्वत्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना भारतात त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय बालिका दिवस भ्हणून साजरा केला जातो. पुणे येथील बुधवार पेठ भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. आणि त्याचा लाभ आज भारतातील संपुर्ण मुलीं घेत आहेत, त्यामुळे देशात आज सर्वच क्षेत्रात स्त्रीया प्रार्थनीय दिसत आहेत व देशाच्या विकासाला चालना मिळत आहे. असे मत व्यक्त करून विद्यार्थांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी शाळेतील शिक्षीका उशा ऊबाळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले . या वेळी शाळेतील सर्व शिक्षक आशा काळे, कांचन शिरसाट, सुरेश सुरत्ने, प्रा. प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशास्वीतेसाठी शाळेतील इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
अभिवादन सावित्रीच्या लेकींच....
आज दि.3/जानेवारी.2022, रोजी श्री.सखाराम महाराज विद्यालय/स्व.रामकृष्ण आढे उच्च माध्य,विद्यालय केळीवेळी ता.अकोट जी.अकोला येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांचा जनमोस्तव मोठया आनंदाने साजरी करण्यात येऊन, उच्च माध्य,विद्यालयातील 12.विच्या विध्यार्थिनींनी दि.01/01/2022,ला अकोट येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत (100.मीटर रनिंग उंच उडी, कबड्डी)भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावत एकाच वेळी One स्ट्रोक मध्ये तब्बल 7.गोल्ड मेडल प्राप्त केले, करिता सर्व विजयी विध्यार्थिनींचा आज दि.03/01/2021 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी सर्व शिक्षकरुंद समवेत सत्कार केला
आणि आज खरोखरच सावित्रीबाई फुले यांच्या श्रमाचे चीज झाल्यासाखे वाटून आमच्या गोल्ड मॅडलिस्ट 7.विध्यार्थिनींच्या माध्यमाने त्यांना खरी आदरांजली अर्पण केल्यासारखी वाटली. तसेच उच्च माध्य,विद्यालयाचे साहाय्यक अध्यापक बी.एम.चक्रनारायण सर यांनी ह्या 7.गोल्ड मॅडलीस्ट विध्यार्थीनींच्या पदवी शिक्षणापर्यंत 3.वर्षाचा ऍडमिशन फी,रजिस्टर, पुस्तके, ड्रेस, असा जेवढाही खर्च येईल तेवढा खर्च करण्याची जवाबदारी मा.मुख्याध्यापक/प्राचार्य शिक्षकरुंद आणि सर्व उपस्थित विध्यार्थी यांच्या समोर जाहीर केले.
त्याचप्रमाणे ह्या विजयी मुलींच्या टीमची दि.12/01/2022.च्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यासाठी लागणारे मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यासाठी मा.मुख्याध्यापक/प्राचार्य सर यांनी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्रशिक्षक श्री.अमोल चिलात्रे सरांना सूचित केले, आणि श्री.चिलात्रे सरांनी सुद्धा सरांच्या सूचनेचा सन्मान करून स्पर्धे्कांना योग्यवेळी मार्गदर्शन,प्रशिक्षण देण्याचे जाहीर करून, तसेंच बहुसंख्य विध्यार्थी विध्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण केले त्यानंतर मा.प्राचार्य सरांनी सावित्रीबाई फुलेच्या जीवनावर बोधात्मक प्रकाश टाकून कार्यक्रमांची सांगता होऊन श्री.अमोल चिलात्रे सर यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या