Ticker

6/recent/ticker-posts

नेहल, अमृता , पूर्वा या तीन कलाकारांचे आपापल्या क्षेत्रांमध्येनाविन्यपूर्ण कार्य

नेहल, अमृता , पूर्वा या तीन कलाकारांचे आपापल्या क्षेत्रांमध्येनाविन्यपूर्ण कार्य 


अकोला
समाजाला दिशा देण्याचे काम मातृशक्ती करत असून आपल्या संस्कारातून समाज परिवार राष्ट्र आणि आपल्या शहराचे नाव लौकिक करणाऱ्या पूर्वा प्रमोद बगलेकर, अमृता कुशल सेनाड, कुमारी नेहल विकल्प ठाकूर या तीन कलाकारांचे आपापल्या क्षेत्रांमध्येनाविन्यपूर्ण कार्य केले त्यांचे श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ ओम मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने सत्कार व गौरव करून त्यांच्या कलाचा आदर व सन्मान त्यांच्या परिवाराला नमन कार्यक्रम समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा अध्यक्ष विलास अनासने यांच्या मार्गदर्शनात जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्या मातृशक्ती ने केला.


संगीत क्षेत्रामध्ये नेहल ठाकूर, रांगोळी क्षेत्रामध्ये अमृता सेनाड, मूर्तिकला क्षेत्रांमध्ये पूर्वा बगले कर यांच्या निवासस्थानी जाऊनपुष्पा वानखडे ,सारिका देशमुख, मनीषा भुसारी, कल्पना अडचुले, रेखाताई नालट, रेखा लोणकर, प्रीती कुरवाळे , चौधरी काकू मुक्ता बोपटे. यांनी गौरव केला.
श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्या वतीने प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आपल्या कला प्रदर्शन तिनही कलाकारांनी करून श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या राम प्रसादाचे व गौरवाचे स्वीकार करून धर्म आणि अध्यात्म क्षेत्रा सोबत समाजाची शी एकरूप होऊन कार्य करण्याची प्रेरणा घेऊन कार्यरत राहू असे अभिवचन दिले यावेळी तिन्ही परिवारांनी श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ जागरण मातृशक्ती समिती चे स्वागत केले. समिती सातत्याने वेगवेगळे धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून 365 दिवस समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम चांगल्या कामांना प्रोत्साहन करण्याचे काम सातत्याने करीत आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या