प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमांमध्ये शास्त्री क्रीडांगण येथे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेतल्या तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चे पारितोषिक दिले . यावेळी सविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 5 ते 6 हजार चौरस फुटांमधे रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी सौ. अमृता सेलाड यांनी बारा तासामधे साकारली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी त्याचे व संपुर्ण टीमचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक हे उपस्थित होते. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस विभागातर्फे पथसंचलन करण्यात आले. या कार्यक्रमाला पाहण्यासाठी नागरिकांची शास्त्री स्टेडियम येथे मोठी गर्दी झाली होती. कोरोना संसर्ग प्रतिबंधाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी यावेळी प्रशासनातर्फे घेण्यात आली.
श्री संत तुकाराम महाराज शिक्षण संकुलात भारतीय प्रजाकसत्ताक दिन उत्साहात साजरा...
विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा
यावेळी प्रा. राधीका इंगोले हेलगे मॅडम यांनी ध्वजारोहन केले यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच तबांखु मुक्ती ची शपथ घेण्यात आली यावेळी ध्यजवंदन कार्यक्रमाचे संचालन निळकंठ म्हैसने सर यांनी केले. तसेच संस्थासचिव प्रा. देवानंद गावंडे यांनी सैनिक आणी शेतकरी यांच्या कार्याचे देशाकरीता असलेले महत्व या आशयाची कविता सादर केली तसेच इतर मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.
स्थानिक अकोट तालुक्यातील श्री संत तुकाराम महाराज तसेच वरीष्ठ महाविद्यालयात साजरा करण्यात आला या वेळी वृंदावन शिक्षण संस्था चोहोटटा बाजार चे अध्यक्ष आदरणीय गोकुळभाऊ गावंडे यांचे संकल्पने नुसार तसेच या संस्थेच्या पदाधि- याप्रमाणे कार्यरत कर्मचा-यांना सुध्दा झेंडावंदनाचा सन्मान मिळावा हा उदात्त हेतुने प्रा. राधिका मोतीरामजी इंगोले (हेलगे) यांनी ध्वजारोहन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यां संस्थेचे आदरणीय अध्यक्ष गोकुळभाऊ गावंडे तर प्रमुख अतीथी म्हणुन संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव गोंडचवर संस्थचे सचिव प्रा. देवानंद गावंडे समन्वयक प्रा. निळकंठ सुरसे प्राचार्य शशिकांत खोटरे तसेच संत तुकाराम महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील वानखडे हे उपस्थीत होते. प्रमुख अतीथी यांनी महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे हारार्पण केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री प्रशात पवार तर आभार प्रदर्शन श्री हेंमत बाहकर यांनी केले. यावेळी विद्यालय माध्यमिक विभागातील वर्ग ८ ते १० चे शिक्षक व कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील तसेच आश्रमशाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. सदर कार्यक्रम कोवीड नियंमाचे तसेच सामजिक अंतर ठेवुन घेण्यात आला
खेंडकर ज्ञानगंगेमधे प्रजासत्ताक दिन साजरा
अकोला :
सरस्वती नगर, जुना वशीम बायपास, अकोला येथील खेंडकर ज्ञानगंगेमधे आज २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर शारिरीक अंतर ठेवून कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. खेंडकर ज्ञानगंगेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात भारतीय ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी मात्र चुमुकल्या विद्यार्थांना शाळेच्या आवारात मुभा नोहती. परंतु शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांच्या उपस्थीतीत मोठ्या उत्साहात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय ध्वजाला सलामी देऊन व राष्ट्रगीत घेऊन ध्वजप्रणाम करण्यात आला. खेंडकर विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८.००. वा. ध्वजारोहनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन व ध्वजारोहन संस्थेचे सचिव व विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. निलेश खेंडकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून स्व. यमुनाबाई खेंडकर प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मा. अल्केश खेंडकर यांची प्राथनीय उपस्थीती होती. शाळेतील शिक्षीका आशा काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले . या प्रसंगी ध्वजारोहण व ध्वजप्रणाम करण्यात आला आणि सविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.
या वेळी शाळेतील सर्व शिक्षक ऊभा उबाळे, कांचन शिरसाट, माया खोडके, सुरेश सुरत्ने, प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे, प्रशांत काळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशास्वीतेसाठी शाळेतील इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
घरगुती काम काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष पास
अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने महा शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून प्रत्येकाच्या योगदानाला नमन करण्याची त्यांची शैली व गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रम दिल्ली येथे पाहता यावा यासाठी कामगार ऑटो चालक, ड्रायव्हर घरगुती काम काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष पास देऊन त्यांचा सन्मान करून जीवनातील महत्त्वाचा क्षण पाहता यावा व देशाच्या योगदाना मध्ये प्रत्येकाचा वाटा असल्याचा कृतीने सिद्ध करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याबद्दल खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर भाऊ सावरकर आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी पंतप्रधानांचे आभार व अभिनंदन केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा मान मिळावा यासाठी सातत्याने पंतप्रधान मन की बात, वीर बालकांशी संवाद, जिल्हाधिकार्यांची थेट संपर्क,सैनिकांशी थेट संपर्क कामगारांची थेट संपर्क सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींची थेट संपर्क ही परंपरा सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधून त्यांचा सन्मान करून पंतप्रधानाची सर्वसामान्य नागरिक संवाद साधू शकतो शकतो ही कृतीने सिद्ध केले. तसेच गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने कामगार ड्रायव्हर यांचा सन्मान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन आयाम निर्माण केला विशिष्ट लोकांना सन्मान देणे देणे हे ही परंपरा होती या परंपरेला वेगळेपण देऊन वेगवेगळ्या जातीधर्मातील कामगारांना ड्रायव्हरांना आमंत्रित करून हा सोहळा पाहण्याचा अवसर उपलब्ध करून दिल्याबद्दल पंतप्रधानांचे भारत सरकारचे भाजप नेत्यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त कृषी विद्यापीठ मजूर कॉ. विद्याधर ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले...!
अकोला दि. २६.०१.२०२२ स्थानीक जुने शहर स्थित भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना कार्यालयात प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला सर्व प्रथम राष्ट्रिय ध्वजरोहन कृषी विद्यापीठ मजुर कॉ. विद्याधर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर उपस्थिताना मार्गदर्शन करताना कॉ. रमेश गायकवाड म्हणाले की भारत स्वतंत्र व्हावा या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व त्यांचे नेते कार्यकते अग्रस्थानी होते सर्व धर्म समभाव टिकवण्याचे काम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भारतात व जगात केला आहे १९४७ अगोदर ज्या देशाचे भारतावर राज्य होते त्या लंदन देशातील नागरिक व इतर अनेक देशातील व भारत येथे सुद्धा भारत स्वतंत्र व्हावा म्हणुन कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांनी आंदोलने मोर्चे काढले आपल्या जीवाची आहुती दिल्या आहेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते भारात गोवा मुक्ती आंदोलनात आपल्या बलिदान दिले आहे हे विसरता कामा नये म्हणुन या आझाद भारतात जे जाती जातीत तेढ निर्माण करुण विष कालु पाहत आहे त्यांना त्यांची जागा दाखवून वेळ आल्यास कॉ. गोविंद पानसरे यांच्या सारखे बलिदाना साठी तयार रहा असा संदेश उपस्थिताना दिला..! राष्ट्रिय ध्वजारोहण करिता कॉ. रमेश गायकवाड, कॉ. रामदास ठाकरे, कॉ. नयन गायकवाड, कॉ. विद्याधर ढोरे, कॉ. सुहास अग्निहोत्री, कॉ. गणेश खुंटे, कॉ. संतोष कुमरे, कॉ. सुमित गायकवाड, कॉ. कुरुमदास गायकवाड कॉ. माधव महल्ले, कॉ. तुनुश गायकवाड अनेक पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते..! असे कॉ. मदन जगताप आपल्या प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळवीतात..!
0 टिप्पण्या