जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कोरोनाचे निर्बंध केले लागू
अकोला : कोरोनाचा वाढता आलेख पाहता राज्य सरकारचे जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कोरोनाचे निर्बंध लागू केले असून आज आदेश पारित केले आहेत.
यामध्ये दिवसा जमावबंदी असेल तर रात्री संचारबंदी राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवांसाठी सूट देण्यात आली आहे. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे, स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णत: बंद तर थिएटर, सलून हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. तर सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्के, विवाहासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक मेळावा, कार्यक्रमात 50 व्यक्तीची तर अंत्यसंस्कारला 20 व्यक्तींची मर्यादा राहणार आहे.
नियमांचे पालन करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाना दिले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.
0 टिप्पण्या