O.B.C आरक्षण वाचवायचे????
आज दि,23/डिसेंबर/2021 हा दिवस सर्व OBC जात/समाज/आणि घटकांच्या जनतेनी आणि लोकांनी व मतदारांनी लक्षात ठेवले पाहिजे,आज भा.री.प,बहुजन,वंचित आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्व वंचितचे आंदोलनकर्ते श्रद्धेय ऍड.बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित यांच्या मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली OBC.चे गेलेले राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी विधान भवन मुबंई येथे मोर्चाचे आयोजन. करिता अकोला येथून डॉ.संतोष हुशे सर, पं.स.सभापती/उपसभापती मा.राजेश वावकार साहेब, सह,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मा.विकास सदांशीव साहेब, माजी जी.प.सदस्य मा.अशोकराव गाडगे साहेब, तसेच रुग्णसेवक मा.नितीन सपकाळ साहेब, तसेच बहुसंख्य सक्रिय कार्यकर्ते आणि सदस्य आणि समानतावादी विचारसरणीचे बहुसंख्य मतदार, आणि तमाम महाराष्ट्रातील वंचित आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.
Obc आरक्षण बचावाची मोर्चामध्ये मागणी करित असता आणि तो बहुसंख्य obc.च्या आरक्षण बचावाच्या मोर्चाचा भारदस्त दबाव पाहून विद्यमान आघाडी सरकार अक्षरशः घाबरून जाऊन,मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे मुंबई येथे पोलीसतर्फे मोर्चा थांबवण्यात येऊन विद्यमान आघाडी सरकारच्या आदेशानुसार पोलीसांनी तमाम पदाधिकारी,कार्यकर्ते,व आंदोलक यांना मोर्चाची सांगता होईपर्यंत बसवून ठेऊन नंतर सन्मानपूर्वक सोडून दिले.
तरी तमाम Obc.जाती,धर्म,पंथाच्या भरवश्यावर फक्त राजकारण करून आपल्या शेकडो पिढ्यासाठी करोडो अरबो. रुपयाची कमाई करून ठेवणारी महाराष्ट्रातील मोजकी घराणेशाही आज Obc.च्या हक्कासाठी लडणारे किव्वा लडणारा एकही घराणेशाही मधला कुणीही दिसतच नाही हे विशेष.
म्हणून Obc.च्या लोकांनी तुमचे खरे हक्क हिसकून घेणारे कोण, आणि तुम्हाला हक्क नाकारू पाहणारे कोण हे लक्षात ठेऊन जर तुमच्यात सुधारणा झाली तर तुम्ही वाचले नाहीतर तुमची बरबादी नक्की आहे हे समजून घेणे महत्वाचे, आज तुमचे राजकीय आरक्षण गेले तर उदया किव्वा भविष्यात तुमचे शैक्षणिक, आर्थिक आणि नोकरीमधील सुद्धा आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही हे पक्के समजा. तरी सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलक्कांना माझ्यातर्फे भरपूर शुभेच्छा
प्रा.बी.एम.चक्रनारायण पातूर नंदापूर ता.जी.अकोला 7057960054
0 टिप्पण्या