Ticker

6/recent/ticker-posts

बनावट दस्तऐवज तयार करून राखीव जंगलातील अधिकान्यांच्या सागवान झाडांची अवैध कटाई

बनावट दस्तऐवज तयार करून राखीव जंगलातील अधिकान्यांच्या सागवान झाडांची अवैध कटाई

दोन दिवस होऊन सुध्दा कोणतीही कारवाई झाली नाही.

श्री. प्रकाश विजय डाखोरे रा. नवेगांव ता. पातुर जि. अकोला यांचे शेत स.नं. ५८/४ क्षेत्र ५७ आर ची मोजणी करून बनावट 'क' प्रत तालुका भुमी अभिलेख कार्यालय पातुर येथून तयार करून वनक्षेत्र अधिकारी आलेगांव यांच्याकडे ७२ सागवान झाडे तोडण्याच्या परवानगी बाबत अर्ज सादर केला. सहायक वनसंरक्षक अकोला यांनी व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक अकोला यांनी एनओसी दिली. दिलेल्या एनओसीमुळे वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगांव यांनी ७२ सागवान झाडे तोडण्याची दि. १५/३/२०२१ रोजी परवानगी दिली. वास्तविक पाहता सदर शेतकऱ्यांच्या शेतात ४ सागवान झाडे असतांना ७२ झाडे तोडण्याची परवानगी दिली व त्याचे व त्याच्या नातेवाईकांच्या शेतात चार व एकूण ८ असतांना बाकी ६४ झाडे श्रीव जंगल कम्पार्टमेन्ट नं. २३ मधून तोडण्यात आले. बहुतेक सर्व झाडांची गोलाई १५० से.मी. च्या वर आढळली याबाबत. या प्रकरणाचा गेल्या नऊ महिण्या पासुन पाठपुरावा केल्यामुळे श्री. पडगव्हाणकर स.व.स. भव अकोला यांच्याकडे चौकशी दिली.


 सदर चौकशीमध्ये ५९ सागवान झाडे कम्पार्टमेंट न. २३ राखीव जंगलामधील तोडल्याचे सिध्द झाले आहे. तसेच ५ सागवान झाडे राखीव जंगलात उभी आहेत. शेतकरी व त्यांच्या नातेवाईकाच्या शेतात ८ सांगवान झाडे आढळून आले आहे. शेताचे क्षेत्र ५७ असतांना २५ एकर शेतातील झाडे तोडण्यात आली. याबाबतचा चौकशी अहवाल सादर करून सुध्दा आजपर्यत दोषी अधिकारी व शेतमालक यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच सदर शेतकरी व त्याचे नातेवाईक यांचे ४ एकर क्षेत्रात अतिक्रमण असुन अतिक्रमण क्षेत्रात त्यांनी ट्रॅक्टच्या सहायाने नागरटी वखरटी करून हरभरा गहू व तुर पेरलेली आढळून आली. तरी याबाबत संबंधीत अधिकारी तसेच तालुका भुमी अभिलेख कार्यालय पातुर येथील अधिकारी यांच्यावर कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच शेतकरी याच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. ही कार्यवाही न झाल्यामुळे मी के.डी. श्रीवास से. नि. वनपरिक्षेत्र अधिकारी व उत्तम श्रीपत खुळे उपसरपंच ग्राम पंचायत पहाडशिगी आम्ही दि. २२/१२/२०१२ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करीत आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या