Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात ओमायक्रॉनचा निघाला पहिला रुग्ण; युवती आली होती दुबईहून, तिचा अहवाल निघाला पॉझिटिव्ह!

अकोल्यात ओमायक्रॉनचा निघाला पहिला रुग्ण; युवती आली होती दुबईहून, तिचा अहवाल निघाला पॉझिटिव्ह!



 अकोल्यात दुबईवरून आलेल्या त्या युवतीचा ‘ओमायक्रॉन’ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यमुळे अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला होम कोरोनटाईन ठेवण्यता आले आहे. अकोल्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने नागरिकांनी आतातरी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या भयंकर आहे. मागील आठवड्यात शेजारील बुलडाणा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. या घटनेला आठवडा होत नाही, तोच अकोल्यात दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल १९ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. 


त्यामुळे ओमायक्रॉनच्या निदानासाठी युवतीचे ‘आरएनए’ सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. रविवारी त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. युवतीची प्रकृती स्थिर असून तिला होम कोरनटाईन ठेवण्यात आले आहे. अकोलेकरांसाठी ही धोक्याची सुचना असून, नागरिकांनी आता तरी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 145 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉ‍झिटीव्ह आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे अकोला येथे दि. 18 रोजी दाखल झालेल्या एका कोरोना बाधीत महिलेचा ओमिक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.
काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57909(43297+14435+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य  = एकूण पॉझिटीव्ह एक.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 342609 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 338953 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3254 नमुने होते. आजपर्यंत एकूण 342609 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 299312 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.  
एक पॉझिटीव्ह
आज  दिवसभरात एका पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून तो अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एका रुग्णाचा अहवाल ओमीक्रॉन पॉझिटिव्ह
 दरम्यान अकोला येथे दि. 18 रोजी दाखल झालेल्या एका कोरोना बाधीत महिलेचा ओमिक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. ही महिला दुबई येथून प्रवास करून आली होती. सद्यस्थितीत ह्या रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
एकाचा मृत्यू
दरम्यान काल एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण 60 वर्षीय पुरुष असून रोहणा, दहिहांडा येथील रहिवासी आहे. त्याना दि. 18 डिसेंबर  रोजी रुग्णालयात दाखल केले होते,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
सहा जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57909(43297+14435+177) आहे. त्यात 1142  मृत झाले आहेत. तर 56761 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत सहा जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 192 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 192 चाचण्या झाल्या त्यात एकाचा  अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. 
       काल दिवसभरात अकोट येथे 10, अकोला महानगरपालिका येथे 130, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे 29, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, तर हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 192 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या