Ticker

6/recent/ticker-posts

राजस्थान येथील ढांढणच्या पवित्र देवस्थान राजराजेश्वर नगरी अकोल्यात आगमन

राजस्थान येथील ढांढणच्या पवित्र देवस्थान राजराजेश्वर नगरी अकोल्यात आगमन



अकोला ।
राजस्थान येथील ढांढणच्या पवित्र देवस्थान असलेल्या श्री ढांढण वाली दादी ह्या देवी असंख्य कुळ-कुटुंबांच्या अनेक पीढ्यांपासुन कुलदैवत राहिल्या आहेत. 
अशा सर्व कुटुंबाचे, म्हणजेच श्री ढांढण वाली दादी यांच्या भाविकांचे धार्मिक पावन असे स्नेह सम्मेलनाचे दर वर्षी कोठे न कोठे फिरते आयोजन  होत असतो. म्हणजे देशाच्या  प्रत्येक प्रांताच्या प्रत्येक क्षेत्रातील भाविकांना ह्या पावन आयोजनाची सुवर्ण संधी त्यांच्या अंगणात येवून प्राप्त होते. 
सुसंयोगाने यंदा 2022 च्या सुरवातीला दि. 25-26 जानेवारी ला हे वैश्विक नेत्रदीपक आयोजन राजराजेश्वर नगरी अकोल्यात नियोजिले आहे. 
दरवर्षी अविस्मरणीय ठरत आलेला श्री ढांढण वाली दादी भक्तांचा पवित्र भव्य मेळावा अकोल्यात होत असुन त्याच्या अचूक, उच्चस्तरीय, भाविकांच्या सर्व सोयी सुविधेचे भान ठेवून व्यवस्था केली जात आहे. ह्या भव्य आयोजनाची जैय्यत तयारीची मोठी सुरुवात देखील झाली आहे.
 शक्तिस्वरूप पूज्य असलेल्या ह्या मातेच्या आराधक असलेले देशभरातील श्रध्दालु भक्तगण मोठ्या संख्येने यानिमित्ताने अकोला नगरीत येत अआहेत. त्याच्या अपेक्षे प्रमाणेच ह्या अर्चनेप्रित्यर्थ भक्ती भावयुक्त भजन कीर्तनाचे श्रेष्ठ आणि उत्कृष्ट कोटिचे आयोजन ठरविण्यात आले आहेत. 
ह्या निमित्ताने महाराष्ट्रात कधीच न आलेले भाविकपण भागवत भक्तिच्या आध्यात्मिक ऐतिहासिक पृष्ठभूमिच्या अकोल्याशी परिचित होवून संपर्कात येत आहेत. 
विशेषतः बजाज आणि भरतीया वंश कुळाच्या कुलदेवी समजल्या जाणार्‍या ह्या डीसी मातेच्या भाविक कुटुंबियांचा अखि जील भारतीय वार्षिक वसंत महोत्सव हा 22 वा होत आहे. 


विश्व स्तरीय सुप्रसिद्ध भजन गायक श्रीयुत संजयजी अगरवाल तसेच त्याच जोडीचे श्रीयुत नवीनजी जोशी आणि श्रीयुत मूलचंदजी बजाज आणि सर्वदूर सुविख्यात असलेल्या सुश्री उमाजी लहरी संगे अनेक गायन व  संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार या प्रसंगी आपल्या कला गुणांनी देवी मातेची आराधना व भजने सादर करणार आहेत. 
अकोल्यात अगदी केंद्र स्थळी असलेले स्थानिक पोलीस संस्थेचे राणी लान येथे *श्री राणी सती धाम परिसर* जिल्हा परिषद रोड, अकोला येथे हे भव्य दिव्य असा पुनीत पावन कार्यक्रम होत असुन निश्चितच हे आयोजन अकोल्याच्या श्रध्दा भक्ती आणि आध्यात्मिक इतिहासात एक अविस्मरणीय प्रसंग म्हणुन गाजेल, नावलौकिक मिळवेल ह्यात तिळमात्र शंका नाही.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या