मा.वसंत खंडेलवाल न्याय देण्यात यशस्वी ठरणार असा विश्वास -माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला
समाजाच्या शेवटच्या घटकाची सेवा करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्मता मानवता वाद चा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी, आमदार खासदार व सरकारच्या मध्ये महत्त्वाची भूमिका करीत करीत असतात त्यांचे प्रतिनिधी म्हणून वसंत खंडेलवाल न्याय देण्यात यशस्वी ठरणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भाजपा आमदारांची बैठकीत नवनिर्वाचित आमदार वसंत खंडेलवाल यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते . यावेळी मंचावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, डॉक्टर संजय कुटे, आमदार आशिष शेलार, जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर वाशिम जिल्हा अध्यक्ष आमदार आमदार राजेंद्र पाटणीआमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल आमदार आकाश फुंडकर आमदार श्वेता महाले आमदार लखन मलिक आधी मंचावर विराजमान होती
जय-पराजय राजकारणात चालत असतात नम्रता, सर्वांचा सन्मान गौरव, सोबत सत्तेची मस्ती न आणता प्रत्येकाचा आदर व प्रत्येकाच्या महत्त्व लक्षात घेऊन -अपमान न करता विकासाचा उद्दिष्ट घेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम लोकप्रतिनिधी करावं वसंत खंडेलवाल परिवाराच्या संस्कारातून व तपस्या, त्याग आदर करणाऱ्या परिवारातून आल्यामुळे ते समाजकारण राजकारणात व लोकप्रतिनिधी मध्ये लोकप्रिय ठरतील असाही विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील जनता भाजपाच्या पाठीशी असल्याचा . प्रत्य या निवडणुकीत खंडेलवाल , चार उमेदवारांच्या विजयाने सिद्ध झाले असल्याचेही फडणवीस यांनी सांगून ज्येष्ठा कडून शिकवण घेऊन कार्यरत खंडेलवाल होणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खंडेलवाल यांनी तिन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच मतदार यांनी जात-पात धर्म सोडून पक्षभेद विसरून माझ्यावर पक्षाने व नेत्यांनी टाकलेली जबाबदारी, विश्वास सार्थ केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी फडणवीसांनी आमदार सावरकर विजय अग्रवाल पाटणी, आमदार फुंडकर आमदार गोवर्धन शर्मा शर्मा, आमदार संजय कुटे सर्व लोकप्रतिनिधी यांचे अभिनंदन केले
0 टिप्पण्या