ह भ प रंगराव टापरे महाराज यांच्या निधनाने अध्यात्म व धार्मिक क्षेत्राची फार मोठी हानी
अकोला
परम संत वारकरी आणि अध्यात्म क्षेत्रांमध्ये अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यातील भाविक भक्तांचे आधारस्तंभ रुक्मिणीचे परमभक्त ह भ प रंगराव टापरे महाराज यांच्या निधनाने अध्यात्म व धार्मिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली व ज्येष्ठ मार्गदर्शक हरवला या शब्दात माजी केंद्रीय राज्य मंत्री खासदार संजय धोत्रे यांनी रंगराव महाराज यांच्या दुःखद निधन याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अकोला लोकसभा मतदार संघाच्या वतीने समस्त मतदारांच्या वतीने त्यांना भाव सुमन करून श्रद्धांजली अर्पण केली.
रंगराव महाराज यांनी रुक्मणी ते पंढरपूर पालखी सोहळा चा विस्तार करून अकोला बुलढाणा वाशीम अमरावती वर्धा जिल्ह्यातील भाविकांच्या भावना आपल्या कृतीने तसेच अध्यात्म व प्रवचनाने समाजप्रबोधनाचे कार्य करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी करून अकोला जिल्हा भाजपच्या वतीने त्यांच्या दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ व मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा यांनी हरी भक्त पारायण रंगराव महाराज कापरे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर एकनाथ महाराज सावता माळी यांची वारकरी परंपरेला समृद्ध करण्याचे काम करून समाजातील अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार मध्ये चेतना जागृती करून वारकरी संप्रदाय आला देशात दिशा देण्याचे कार्य केले आहे त्यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक, धार्मिक वारकरीस क्षेत्रांमधील व अध्यात्म क्षेत्राची फार मोठी हानी झाली अशा शब्दात आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. भाजपा महानगराध्यक्षपदी अगरवाल आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल तेजराव थोरात पद्माकर मोरे यांनीसुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
0 टिप्पण्या