पाटील बहुउद्देशीय सेवा समिती व अकोला जिल्हा मराठा मंडळाचे 'ऋणानुबंध 'उपवर युवक-युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन
अकोला —अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समिती चे संयुक्त विद्यमाने समाजातील विवाहयोग्य मुलामुलींचे सोयरीकसंबंध जुळवणे सोईस्कर व्हावे म्हणुन 'ऋणानुबंध' उपवर युवक-युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन अत्यंत साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या हस्ते संपन्न झाले.
पाटील सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार,सचिव श्रीकृष्ण विखे,अकोला जिल्हा मराठा मंडळाचे सचिव प्रकाश पाटील हागे,गोपाळराव आखरे,मनोहरराव महल्ले, बबनराव कानकिरड, पद्माकर महल्ले,महेंद्र पाटील,प्रा.डाॅ.शैलेंद्र कडु,प्रशांत काळे,निखील पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. सामुहिक व कमीत कमी खर्चाचे लग्नसोहळे घडवुन आणणे,दरवर्षी भाऊबीजेच्या दुसर्या दिवशी उपवर युवक-युवती व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करणे,' ऋणानुबंध' परिचयपुस्तिका प्रकाशित करणे,अंधश्रद्धा निर्मूलन करणे अशाप्रकारे समाजाचे प्रबोधन करुन विधायक दिशा देण्याचे काम अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील बहुउद्देशीय सेवा समिती करीत आहे.
अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॅ.रणजीत सपकाळ,उपाध्यक्ष अँड.संजय पाटील,सचिव प्रकाश पाटील,कोषाध्यक्ष डाॅ.विनोद बोर्डे,सहसचिव अँड.अभय थोरात,सदस्य -शिवाजीराव देशमुख,दिवाकर पाटील, प्रा.डाॅ.विवेक हिवरे,,श्रीकांत पागृत,दीपक आखरे,पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार,सचिव श्रीकृष्ण विखे,गोपाळराव आखरे,देविदास कोरपे,मनोहरराव महल्ले,राजाभाऊ विखे,समाधान पाटील मडाखेड,सुरेश पागृत,बबनराव कानकिरड,पद्माकर महल्ले,महेंद्र पाटील,प्रशांत काळे,निखील पाटील,अँड.रामेश्वर खोंड,किशोर पाटील, प्रा.जयश्री बंड,सौ.प्रतिभा काटे,प्रा.ज्योती इंगळे,अजय निचळ,सौ.गौरी ठाकरे,अशोकराव बोंद्रे,नंदकिशोर मिरगे,क्ऋषीकेश मोरे,बजरंग गावंडे,प्रा.दिनकर पाटील यांनी परिचय पत्र संकलीत करण्यासाठी परिश्रम घेतले.
ही पुस्तिका दररोज दु.१२ते५वाजेपर्यंत श्री गणेश झेराॅक्स सिव्हील लाईन चौक येथे उपलब्ध राहील.अधिक माहितीसाठी प्रशांत काळे 9823237089,महेद्र पाटील 8888025891 यांचेशु संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या