अकोला जिल्ह्यातील १० मंडळामध्ये दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमाचे आयोजन
अकोला
दि.13 डिसेंबर, 2021 ते१४ जानेवारी २०२२ दरम्यान अकोला जिल्ह्यातील १० मंडला मध्ये दिव्य काशी भव्य काशी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा सरचिटणीस माधव मानकर यांनी दिली.माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे , जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अगरवाल महापौर अर्चना ताई मसने तेजराव थोरात यांच्या मार्गदर्शनात अकोला तालुका मध्ये गणपती मंदिर कापशी तलाव व भवानी मंदिर दहीगाव येथे, पातुर मंडलात श्री सिदाजी महाराज मंदिर, पातुर, बाळापुर ग्रामीण मंडल- श्री जागेश्वर मंदिर वाडेगाव येथे तसेच बाळापुर शहरात श्रीराम मंदिर बाळापुर येथें, तेल्हारा मंडल- श्री महादेव मंदिर, अकोट ग्रामीण माहे श्री वासुदेव महाराज संस्थान वडाळी सटवाई, अकोट शहरात श्रीराम मंदिर, मुर्तीजापूर ग्रामीण मंडल मध्ये श्रीराम मंदिर माना, भवानी मंदिर विराईत, तसेच लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान.
तसेच बार्शीटाकळी मंडलात श्री कोळेश्वर मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ही सरचिटणीस माधव मानकर यांनी सागितले. ज्या मंदिर । मठ । आश्रमात कार्यक्रम होणार तेथे कार्यक्रमाच्या आधी व नंतर 'स्वच्छता अभियान' राबविण्यात येणार असून त्या मध्ये सर्व भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी सहभागी होणार आहेत. सकाळी 9.30 ते 10.30 वा. या वेळेत मंदिरात पूजा, अभिषेक, आरती आदी कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. तसेच त्या भागातील सर्व प्रमुख साधु, संत, किर्तनकार, धर्माचार्य यांना आमंत्रित करण्यात येणार असून त्यांचा यथायोग्य सन्मान व पूजन करण्यात येणार असून या कार्यक्रमास संबंधित आमदार, भाजपा पदाधिकारी, विविध आघाड्याचे तालुक्याचे प्रमुख, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या