Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


 अकोला, दि.16(जिमाका)-  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. या योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन  महामंडळाचे जिल्हाव्यवस्थापक यांनी केले आहे.
 महामंडळामार्फत  20 टक्के बीज भांडवल योजने अंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.  त्यात बॅंकेचा सहभाग 75 टक्के महामंडळाचा 20 टक्के तर लाभार्थ्याचा सहभाग पाच टक्के असतो. कर्ज परतफेडीची मुदत पाच वर्षांची असते.  थेट कर्ज योजनेत  एक लक्ष रुपयांचे कर्ज चार वर्षांच्या कर्ज परतफेडीच्या मुदतीने दिले जाते.  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 10 लाख रुपयांची कर्ज मर्यादा असून गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत 50 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी  इच्छुकांनी  www.msobcfdc.org या संकेतस्थळास  भेट द्यावी. अथवा  महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


शासनाच्या विविध योजनांकरीता 11 कोटी 38 लक्ष अनुदान वितरीत



अकोला,दि.16(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनाकरीता ऑक्टोंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीकरीता 11 कोटी 38 लक्ष 49 हजार 300 रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.  प्राप्त अनुदान तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले असून विविध योजनांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात येत आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे तहसिलदार यांनी कळविले आहे.
वाटप करण्यात आलेले अनुदान याप्रमाणे : संजय गांधी राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण करीता 1 कोटी 51 लक्ष 50 हजार रुपये,   संजय गांधी राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसुचीत जातीकरीता 1 कोटी 74 लक्ष 81 हजार 100 रुपये, संजय गांधी राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसुचीत जमातीकरीता 19 लक्ष 86 हजार 900 रुपये, श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारणकरीता 6 कोटी 32 लक्ष 70 हजार रुपये, श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसुचित जमातीकरीता  28 लक्ष 97 हजार रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना 74 लक्ष 6 हजार 800 रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृतीवेतन योजना 2 लक्ष 96 हजार 400 रुपये,  इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजनाकरीता 1 लक्ष 61 हजार 100 रुपये व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाकरीता 52 लक्ष रुपये, असे एकूण 11 कोटी 38 लक्ष 49 हजार 300 रुपये अनुदान संबंधित तहसिलदार यांच्याकडे वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय संजय गांधी योजनाचे तहसिलदार मिरा पोगोरे यांनी दिली.  


दिव्यांगांकरीता युडीआयडी कार्ड वाटप; तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन



 अकोला, दि.16(जिमाका)-जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा याकरीता दिव्यांग वैश्विक ओळखपत्र तयार करण्यात आले आहे.  युडीआयडी कार्ड वाटपाकरीता तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ सर्व दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले.
शिबिरांचे स्थळ याप्रमाणे : जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अकोला येथे  दि. 23 डिसेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 1 जानेवारी 2022 रोजी, पंचायत समिती अकोट येथे दि. 4 जानेवारी, पंचायत समिती तेल्हारा येथे दि. 5 जानेवारी, पंचायत समिती बाळापूर येथे दि. 11 जानेवारी, पंचायत समिती पातुर येथे दि. 12 जानेवारी, पंचायत समिती बार्शीटाकळी येथे दि. 14 जानेवारी व पंचायत समिती मुर्तिजापूर येथे दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 5 यावेळेत सर्व ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्याचे आवाहन



 अकोला, दि.16(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान महाडिबिटी प्रणालीवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्याकरीता शासनाव्दारे विविध   योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी  विद्यार्थ्यांनी दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत महाडिबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल राठोड यांनी केले.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना व व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनाकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत 2021-22 शैक्षणिक वर्षातील महाडिबिटी पोर्टलवर नविन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आली आहे. जिल्ह्यातील सर्व संस्था व महाविद्यालयाच्या प्राचार्य व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी महाडिबिटी पोर्टलवर मंगळवार(दि.14डिसेंबर) पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी दि. 31 जानेवारीपर्यंत mahadbtmahait.gov.in या महाडिबीटी  संकेतस्थळावर अर्ज करावा. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहिल. तरी जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी शासनाच्या  योजनाचा लाभ घेण्याकरीता महाडिबिटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या