गोरक्षण येथे भगवद्गीता गाईंना श्रवण करुन गाईच्या सानिध्यात पाच दिवस गीतेचा पाठ
अकोला
शिक्षणासोबत धर्म, सामाजिक दायित्व चे कार्य सुप्रभात सत्संग मंडळ करून समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
गोरक्षण येथे भगवद्गीता गाईंना श्रवण करुन गाईच्या सानिध्यात पाच दिवस गीतेचा पाठ करून अध्यात्म क्षेत्रामध्ये सुप्रभात सत्संग मंडळाने नवीन आयाम केला तसेच एडवोकेट शरद मिश्रा यांची कन्या साक्षी एमबीबीएस झाल्यावर निमित्त तिचा सत्कार समारोप करण्यात आला. सुप्रभात सत्संग मंडळ पहाटे सतत प्रभूचे गुणगान करून सामाजिक दायित्व पीडितांना मदतीचा कार्य करीत असतील तसेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व समाजाला दिशादर्शक कार्य करीत असल्यामुळे या सत्संग मंडळा समाज सर्व जातीधर्माचे नागरिक जुळले आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी मंडळ पदाधिकारी व साक्षी मिश्रा याचा स्वागत सत्कार केला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर सुभाष हेडा हे होते तर यावेळी नटवरलाल पुरोहित, एडवोकेट महेंद्र पुरोहित, नारायण घुरका, बाळू देशमुख सजन मिष्रा,मुरलीधर भंसाली सत्य प्रकाश मिश्रा एडवोकेट शरद मिश्रा महादेव वानरे डॉक्टर गिरीश लड्डा विजय राठी मीरा शर्मा अनिल सोनी भानुदास मिश्रा नवनीत पुरोहित विनोद बंसल अमरचंद जोशी, सत्यपाल मिष्रा गयासी लाल जी शर्मा ओम प्रकाश जाजू सजन मिष्रा संजय व्यास चेतन शर्मा अनिल सावरीकर संजय पाटील योगेश यादव आधी नागरिक उपस्थित होते.
देशभरात संत गाडगेबाबा यांच्या विचारांना घरोघरी पोहोण्याचा कार्य भारतीय जनता पक्षाने केले साफ सफाई अभियान
अकोला
संत गाडगेबाबांना अभिप्रेत कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून देशभरात संत गाडगेबाबा यांच्या विचारांना घरोघरी पोहोण्याचा कार्य भारतीय जनता पक्षाने केले असून साफ सफाई अभियान सोबत सबका साथ सबका विकास सबका प्रयास च्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात भक्ती श्रद्धा सोबत मानवतेचा कार्य करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधिर भाऊ सावरकर यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संत गाडगेबाबा यांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. गाडगे बाबा यांनी महत्त्वपूर्ण कार्य करून विदर्भात या जनतेच्या दुर्धर आजारासाठी मुंबई येथे धर्मशाळा निर्माण केली. सर्वसामान्यांना आधार दिला शिक्षणाचा महत्व, आरोग्याविषयी दक्ष राहणे साफसफाई व आपल्या प्रबोधनातून समाज निर्माणाचे कार्य व एकतेचे परिचय दिला आहे असेही यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी सांगितले, भाजपा कार्यालयात आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल, तेजराव थोरात महापौर अर्चनाताई मसने, माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर संजय गोडा संजय गोडफोडे निलेश नी नो रे अमोल गोगे गणेश अंधारे संतोष पांडे तालुक्यात देवाशिष काकडे संतोष पांडे, उमेश गुजर धनंजय धबाले गीतांजली शेगोकार राहुल देशमुख, डॉक्टर शंकर वाकोडे, जयंत मसने, संजय जिरापुरे, डॉक्टर विनोद बोर्डे, योगिता पावसाळे चंदा शर्मा संजय बडोणे मनीषा भंसाली, रश्मी कायदे रश्मी अवचार जयश्री दुबे तुषार भिरड गीतांजली शेगोकार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला आणि अमरावती जिल्ह्यात यांचे निकटचा संबंध, तसेच संत गाडगेबाबा धर्मशाळा कशी उपयोगी आहे याचे अनेक उदाहरणे देऊन संत गाडगेबाबांना अभिप्रेत कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भारतीय जनता पक्ष करीत असल्याचे सांगून घरोघरी स्वच्छतेचा संदेश देऊळ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जागृतीचे निर्माण कार्य केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतीने संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले आहे अशीही यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी प्रास्ताविक अनिल गावंडे तर आभार प्रदर्शन रमेश अप्पा खोपरे यांनी केले
गोशाळा महासंघ महाराष्ट्र राज्य विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी ॲड. मोतीसिंह मोहता यांची नियुक्ती
अकोला : गोशाळा महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री महेन्द्रभाई संगोई, मुंबई यांचे उपस्थितीत नुकतीच विदर्भातील ११ जिल्ह्यातील गोशाळा संचालकांची सभा गोकुलम् गोरक्षण संस्था, अमरावती येथे दि. १९.१२.२०२१ रोजी पार पडली. यामध्ये विदर्भातील जवळपास १५० गोशाळांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री गिरीषभाई शहा, मुंबई, समस्त महाजन, श्री विजयभाई वोरा, मुंबई, श्री जयेशभाई शहा, मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. मुरके, विनय बोथरा, डॉ. सुनिल सुर्यवंशी, श्री विजय शर्मा, अमरावती हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये गोशाळेंच्या अडी-अडचणींबाबत चर्चा झाली. या सभेमध्ये अकोला येथील सुप्रसिद्ध अधिवक्ता अॅड. मोतीसिंह मोहता यांची महाराष्ट्र गोसेवा संघाच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्री विजय शर्मा, अमरावती यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प, अकोलाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ॲड. मोहता यांनी यशस्वीरित्या ११ वर्षे धुरा सांभाळली. तसेच अॅड. मोहता हे बार कॉन्सील महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष व वर्तमान सदस्य आहेत. पश्चिम विदर्भातील प्रख्यात दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोलाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकिय व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले अॅड. मोतीसिंह मोहता हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. तसेच भाटे क्लब, अकोला व अकोला जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, अकोलाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. राजस्थानी सेवा संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचा अनेक धार्मिक व सामाजित संस्थांशी जवळचा संबंध आहे. गोरक्षण कार्यामध्ये त्यांनी स्वत:ला झोकुन कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे विदर्भातील गोशाळांना लाभ होईल. या सभेसाठी अकोला येथून विवेक बिडवई, रमाकांत खोपडे, अॅड. धिरज शुक्ला, रवि चांडक, सुरेश खंडेलवाल, राजेश जैन, अरुण बजाज हे प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या