Ticker

6/recent/ticker-posts

रब्बी हंगाम लक्षात घेता, वीज वितरण कंपनीने ट्रान्समीटर त्वरित सुरू करावे- आमदार रणधीर सावरकर

रब्बी हंगाम लक्षात घेता, वीज वितरण कंपनीने ट्रान्समीटर त्वरित सुरू करावे- आमदार रणधीर सावरकर


प्रतीनिधी अकोला-
ग्रामीण भागात अनेक ट्रान्समीटर नसल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत असून वीज वितरण कंपनीने ट्रान्समीटर त्वरित सुरू करावे अशी मागणी अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.
रब्बी हंगामाचा लक्षात घेता धरणांमध्ये   शेत तलाव वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. रब्बी हंगामात लाभ घेता यावा यासाठी वीज वितरण कंपनीने अकोला बाळापूर पातूर बार्शीटाकळी अकोट तेल्हारा मूर्तिजापूर या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजपा कार्यालयात तक्रारी दाखल केल्या . 


वीज वितरण कंपनीकडे तक्रार केल्यावर सुद्धा कंपनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही या समस्येकडे लक्ष न दिल्यास वीज वितरण कंपनी विरुद्ध भारतीय जनता पक्ष  आंदोलन उभारू व महाविकासआघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार विरुद्ध शेतकऱ्यांसोबत जनांदोलन जिल्ह्यात जिल्ह्यात उभा करू असा इशारा आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने तेजराव थोरात माधव मानकर, किशोर पाटील हरिनारायण माकोडे जयश्री पुंडकर मोनिकाताई गावंडे श्रीकृष्ण मोरखडे रामदास लांडे कुसुम भगत सचिन देशमुख योगेश ढोरे प्रवीण डिक्कर किरण आवताडे गणेश कडारकर श्रावण इंगळे रामदास तायडे वामन भिसे अशोक गावंडे गजानन उंबरकार महेंद्र गोयंका कळकोटा भूषण कोकाटे महेंद्र पेजावर अमोल साबळे डॉक्टर शंकरराव वाकोडे रमेश दुतोंडे, बाळासाहेब आपोतीकर, शिवाजीराव देशमुख प्रभाकर मानकर, रमण जैन अभिजीत गहिलोत, महादेव काकड, भूषण भूषण कोकाटे महेंद्र पेजावर रितेश गुप्ता अंबादास उमाळे रमेश आप्पा खोबरे केशव ताथोड, गीतांजली शेगोकार सुमन ताई गावंडे नयना मनात कर आदींनी  सरकार या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या