एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी भाजपाचा आज पाठिंबा
प्रतीनीधी अकोला-
एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी भाजपाने आज पाठिंबा देऊ शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार र्मचार्यांच्या भावना लक्षात न घेता केवळ गप्पांचा बाजार करत असून कर्मचाऱ्यांच्या उद्रेक झाल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागेल असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे
आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने आज एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेऊन कर्मचाऱ्यांना नाईलाजाने सणवार असतानासुद्धा संप पुकारावा लागते. त्यांच्या वेदना , अडचणी, भावना असतानासुद्धा परिवार व एसटी लाल परी बचावासाठी त्यांना आंदोलन करावे लागत आहे. याची जाण त्यांना आहे तसेच त्यांनासुद्धा बहीण परिवार असल्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेऊन सर्वांनी राज्य सरकारवर दबाव आणून एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला भाग पाडावे अशी यावेळी आमदार सावरकर यांनी सांगून संपाला पाठिंबा दिला. भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, उपमहापौर राजेंद्र गिरी तेजराव थोरात अक्षय गंगाखेडकर, संतोष पांडे, निलेश नी नो रे, अमोल गोगे, देवाशिष काकड जयंत मसने संजय गोडा संजय गोडफोडे अक्षय जोशी माधव मानकर अभिमन्यू नळकांडे हेमंत शर्मा पद्माकर मोरे, अमोल मोहोकार, विकी ठाकूर उमेश गुजर, अभिजीत बांगर अनिल गरड विठ्ठल चतरकर, गणेश लोड, प्रशांत आवचार विजय इंगळे, अजय शर्मा हरिभाऊ काळे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते
0 टिप्पण्या