श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिन संपन्न
वनोजा: स्थानिक श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा येथे दिनांक २६/११/२०२१ला संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. नंतर संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले. प्राचार्य डॉ देवेंद्र गावंडे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बापूराव डोंगरे यांनी भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. संविधान प्रत्येकाच्या अधिकाऱाची जपणूक करणारा दस्तावेज आहे ,असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, प्रा.पी एन .लहासे,डॉ. गजानन घोंगटे, प्रा.जे एम. भगत मॅडम, प्रा.डी.डी.भगत, डॉ.एस.एस.कडू, ई.प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी असे एकूण ५९ जणांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या