Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात निर्बंधांची नवी नियमावली, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती

महाराष्ट्रात निर्बंधांची नवी नियमावली, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती


आज 5वा. राज्य सरकारची तात्काळ बैठक


दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचा पालन करावं लागेल, तर इतर राज्यातून येणारा प्रवासी दोन्ही लशी घेतलेला असावा किंवा 72 तासांपूर्वी RT-PCR चाचणी केलेला असावा, असं महाराष्ट्र सरकारनं नव्या नियमावलीत म्हटलंय.


@ राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठीही लशीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आलीय. कार्यक्रम, सभागृह, मॉल्स यांमध्ये प्रवेशासही हा नियम लागू करण्यात आलाय.

@ मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. अन्यथा 500 रुपयांचा दंड आकरला जाईल.

@ राजकीय सभा, कार्यक्रमांमध्ये कोव्हिडच्या नियमांचा उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे.

@ कोरोनाचा नवा प्रकार ‘चिंताजनक’, आफ्रिकेच्या प्रवासावर निर्बंध


@ कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरियंट किती भयंकर?

@ कोव्हिडने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला 50 हजारांची मदत- राज्य सरकार

@ सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असंही आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय.

@ केंद्र सरकारनंही सर्व राज्यांना पत्र लिहून, दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिलेत.

@ आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची नीट तपासणी करण्यास केंद्रानं राज्यांना कळवलंय.

@ दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला BMC क्वारंटाईन करणार

@ दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला क्वारंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटसंदर्भात खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


अजित पवार म्हणाले, काही बंधनं पुन्हा आणावी लागतील!

दिवाळीनंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. 'नाट्यगृह, इतर कार्यक्रम व शाळा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोविडचे नियम पाळूनच सर्व काही करावं लागेल. 'जागतिक स्तरावर पसरत असलेल्या नवीन व्हेरीएन्टच्या संदर्भात वेगवेगळी मतं आहेत. राज्यात नेमकी काय खबरदारी घेता येईल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल.



दक्षिण आफ्रिकेवरून येणारी विमानं बंद करण्याची मागणी

या व्हेरियंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं म्हटलेलं आहे. हा काळजीचा व्हेरिएंट आहे, असा त्यांचा प्राथमिक अनुमान आहे. यामध्ये जी माहिती उपलब्ध झाली, ती संपूर्ण माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला कळवली आहे.


 पंतप्रधान मोदी यांना नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत माहिती दिली.

नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा गुणधर्म, विविध देशांमध्ये त्याचा पाहायला मिळालेला परिणाम, भारतावर होऊ शकणारा संभाव्य परिणाम या सर्व गोष्टींची पंतप्रधान मोदींना माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या