Ticker

6/recent/ticker-posts

स्व अतुल डीक्कर (शाखा अधिकारी) यांना मृत्यू पश्चात उत्कृष्ट कर्मचारी म्हणून केले सन्मानित

स्व अतुल डीक्कर (शाखा अधिकारी)  यांना मृत्यू पश्चात
उत्कृष्ट कर्मचारी म्हणून केले सन्मानित 


 
 डॉ पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठ 35  व्या दीक्षांत समारंभात  कृषी मंत्री दादा भुसे यांचे उपस्थितीत  केले  सन्मानित 





 अकोला --योगतज्ञ .विठ्ठलराव जिभकाटे स्मृती प्रित्यर्थ विद्यापीठाच्या अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना
रोख पारितोषिक व प्रमानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते त्यानुसार  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ  कर्मचारी स्व.अतुल डीक्कर हे मागील 22 वर्षापासून पेंशन विभागात कार्यरत होते उत्कृष्ठ कामगिरी केल्याबड्डल त्यांना मृत्यु नंतर आज राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थिती  मध्ये आणि राज्याचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत  व डॉ   पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही. एम. भाले यांचे हस्ते स्व.अतुल डीक्कर यांना सन्मानित करण्यात आले  स्व.अतुल डीक्कर यांची मोठी मुलगी   वेदश्री डीक्कर  जी सध्या 12 वी मधे शिकत आहे हिने  आज वडिलांचा  पुरस्कार स्वीकारला   आहे
पुरस्काराचे स्वरूप रोख पारितोषिक व प्रमाणपत्र  असे असून या पुरस्काराने स्व अतुल डीक्कर (शाखा अधिकारी)  यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात  आले  त्यामुळे  त्यांचे मित्रमंडळी आणि नातेवाईक आणि डॉ  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधील  आस्थापना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना  आनंदाचे उधाण आले आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या