साल्पी वाल्पी ते हाथोला चाळणी झालेला रस्ता प्रकरणचे आमरण उपोषण मागे
मा. संजय खडसे निवासी जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे युवा मुक्ती आंदोलन संघटनेच्या आमरण उपोषणाची सांगता अकोला. साल्पी वाल्पी ते हाथोला या गावातील चाळणी झालेल्या रस्त्याचे काम शासनाने त्वरीत सुरू करावे यामागणी करीता दिनांक २८-१०-२०२१ पासून साल्पी वाल्पी गावातील आमरण उपोषण करण्याकरिता गीताबाई उइके, रंजनाबाई कांबळे, चंदाबाई भगत, येणूबाई भोसले, संगिताबाई पंधरे, आशाबाई कांबळे, गोकुळाबाई क्षिरसागर हे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथेबसले होते. शासनाने दिवाळी पाहून माननीय संजय खडसे निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पुढाकार घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागनीची दखल घेत संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाची चौकशी करून उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्यासाठी त्यांच्या रस्त्याच्या मागणीची पुर्तता करून लेखी स्वरूपात माननीय नरेश अगम साहेब, कार्यकारी अभियंता जि.प. अकोला यांच्या सहकार्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. याकरिता उपोषणकर्त्या महिलांसोबत माननीय निवासी जिल्हाधिकारी यांनी फोनवर स्वतः संपर्क करून तुमच्या गावातील रस्त्याचा प्रस्ताव येणाऱ्या जिल्हानियोजन विभागाच्या बैठकीमध्ये विशेष बाब म्हणून घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे मार्गदर्शक राजकुमारभाऊ शिरसाट यांनी दिले आहे.
या प्रकरणात माननीय अगम साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांनी तात्काळ इंगळे साहेब उपविभागीय अभियंता जि.प. मुर्तिजापूर व त्यांची टिम यांना गावातील रस्त्याचे मोजमाप घेऊन प्रस्ताव तयार करण्यास सांगितले एका दिवसात सर्व कागदपत्रे गोळा करून रस्त्याचे काम मार्गी लागावे करीता येत्या मंगळवार दिनांक ०२-११-२०२१ बांधकाम समिती जिल्हापरिषद यांच्या बैठकीमध्ये प्रस्तावित केले हे विशेष.
आमरण उपोषणाची सांगता करतावेळी सर्वश्री मा. ओमप्रकाश कमलकिशोर मंत्री जिल्हा बुथ प्रमुख भाजपा, तसेच प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष माननीय मनोजभाऊ पाटील यांचे मोलाचे मागदर्शन व सहकार्य लाभले. उपोषणाला यशस्वी करण्याकरिता संघटनेचे अध्यक्ष मनोज भालेराव संघटनेचे मार्गदर्शक राजकुमारभाऊ शिरसाट, साल्पी वाल्पीचे समाजसेवक अनिल पंधरे, मिलींद क्षिरसागर, दादाराव - सयाम, मधुकर नंदापुरे, मनोहर भांगे, रवी नंदापुरे, विष्णू काकड, राजु चव्हाण, अमोल कांबळे, सतीष सयाम, ईश्वरदास चव्हाण, गजानन उइके, नारायण पंधरे इत्यादींनी परीश्रम घेतले असे संघटनेचे पदाधिकारी प्रविणभाऊ श्रुंगारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 टिप्पण्या