वंचित ला अपक्षांनी लावले ग्रहण
दिनांक 29 ऑक्टोबर 2021
अकोला: अकोला जिल्हा परिषद मध्ये पोट निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेच्या दोन जागेसाठी आज मतदान घेण्यात आले होते त्यामधील अपक्ष सदस्य सम्राट डोंगरदिवे यांना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापतीपद अविरोध विरोधी पक्षांनी दिले तर दुसरे सभापतिपद प्रहार जनशक्ती पक्षाचे महिला बालकल्याण स्मृति निखिल गावंडे यांना मिळाली असून एका च प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्याचा आणि अपक्ष सदस्यांचा यांचा झाला मोठा खेवसत्ता तरी वंचित ला आता पुढील निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मोठा भेव.. सर्वत्र या अपक्ष आणि प्रहार एका सदस्याच्या सदस्यांनी केलेल्या खेळीमुळे सत्ताधारी वंचित पुढील निवडणुकीत विरोधी पक्षाच्या पाठींब्यावरुन वंचित च्या सत्ताधारी ना नाकीनऊ आणल्याशिवाय सोडणार नाही चित्र दिसून येत आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या दोन सभापती पदाची निवडणूक आज पार पडली. यात 'महाविकास आघाडी'ने भाजपच्या मदतीने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषदेतील सत्तेला चांगलाच हादरा दिला आहे. जिल्हा परिषदेतील आज निवडणूक झालेली दोन्ही सभापतीपदं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांच्या आघाडीला मिळाली आहे. महिला आणि बालकल्याण सभापती पदावर बच्चू कडूंच्या 'प्रहार'च्या उमेदवार स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या. त्यांनी वंचितच्या योगिता रोकडे यांचा 29 विरूद्ध 24 मतांनी पराभव केला. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत स्फुर्ती गावंडे यांनी कुटासा गटातून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर शिक्षण सभापती पदावर लाखपूरी गटातील अपक्ष सम्राट डोंगरदिवे बिनविरोध विजयी झालेत. त्यांच्या विरोधातील वंचितच्या उमेदवार संगिता अढाऊ यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याने डोंगरदिवे विजयी झालेयेत. गेल्या वेळी मतदानावेळी गैरहजर राहत आंबेडकरांना अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या भाजपने यावेळी थेट महाविकास आघाडीला मतदान केलं आहे. अकोला जिल्हा परिषदेत भाजपचे पाच सदस्य आहेत.
0 टिप्पण्या