Ticker

6/recent/ticker-posts

बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजुर असोसिएशन अकोला च्या संकल्पाला मजुरांचा प्रचंड प्रतिसाद

बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजुर असोसिएशन अकोला च्या संकल्पाला मजुरांचा प्रचंड प्रतिसाद 


आता शहरातही घेणार  वॉर्डकॅंप आणि करणार मजूर नोंदणी व योजनांची जागृती 




अकोला ---महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, मुंबई विविध कल्याणकारी योजनांची माहिती वंचित राहिलेल्या मजुरांना व्हावी आणि त्या योजनांसाठी मजूर पात्र  व्हावा म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे ही नोंदणी करण्यासाठी



असंघटीत मजुर - बांधकाम मजुर (गवंडी), लोहा बंधाई, इलेक्ट्रनशियन, टाईन्स मजुर, बिल्डींग पेंटर्स, सुतार, पी.ओ.पी., वेल्डर्स, अॅल्युमिनीयम कारागीर इत्यादी.मजूर  गरीबीमुळे कुटूंडाची अपार पातना, प्रत्यक्ष, असंघटीत यांची अपूर्ण माहिती, प्रपंच चालवताना  नाही  करू शकल्यामुळे किंवा इतरही काही अडचणीमुळे  योजनांपासून  वंचित राहिलेल्या सर्व काम करणारे कामगारांची  मोफत मजुर नोंदणीचा संकल्प
१ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत 
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील काम सुरू असणाऱ्या साईटवर जाऊन कंत्राटदाराचे प्रमाणपत्र तथा इतर कागदपत्र तयार करुन २०,०००/- विस हजार वंचित बांधकाम मजुरांची निःशुल्क नोंदणी सुरू केली होती  या  संकल्पाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून अजूनही काही मजूर नोंदणी विना  राहिलेले आहेत त्यांची नोंदणी अधिक लवकर व्हावी म्हणून आज अशोक वाटिका येथे बैठक संपन्न झाली 


 लाभार्थी कामगारास ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २०००००/- (दोन लाख फक्त) एवढे आर्थिक सहाय्य तथापि नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास विमा रकमेची प्रतिपूर्ती अथवा रुपये दोन लाख आर्थिक सहाय्य यापैकी कोणत्याही एकच लाभ अनुज्ञेय राहील, नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास रुपये १०००० (रु. दहा हजार फक्त एवढी रक्कम अंत्यविधी साठी मदत. नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस प्रतिवर्षी रुपये २४००० अक्षरी चोवीस हजार रुपये फक्त एवढे आर्थिक सहाय्य फक्त पाच वर्षापर्यंत, नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रुपये ५०००००- अक्षरी रुपये पाच लाख फक्त एवढे आर्थिक सहाय्य. नोंदील ल कामगारास व नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारास तसेच त्याच्या गंभीर रोग, आजाराच्या उपचारार्थ  १०००००/- अक्षरी रुपये एक लाख सहाय्य. एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटुंबातील दोन सदस्यांमधे, आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय. संगणकाचे शिक्षण एनसीईआरटी घेत असलेल्या नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना शुल्काची परिपूर्ती तथापि एमएस-सीआयटी उत्तीर्ण झाल्याचे।प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपूर्ती. नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाचा खर्चाच्या प्रतिपूर्ती साठी रु.३०,०००/- अक्षरी रुपये तीस हजार फक्त अनुदान.  दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी जिवीत असलेल्या सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी प्रति कामगार रुपये ३०००/- अक्षरी रुपये तीन हजार फक्त एवढे आर्थिक सहाय्य,  नोंदीत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या करिता व्यसनमुक्ती केंद्र अंतर्गत उपचाराकरिता नोंदीत बांधकाम कामगारास रुपये ६०००/-सहा हजार इतके अर्थसहाय्य. नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्थसहाय्य.यासह एकूण 19 योजना शासना मार्फत राबविल्या जातात मात्र अजूनही अनेक प्रत्यक्ष काम करणारे मजूर यांची नोंदणी झाली नाही त्यामुळे ते मजूर या लाभांपासून वंचित राहिले आहेत  अश्या मजुरांसाठी अकोला बिल्डिंग, पेंटर्स,बांधकाम मजूर असोसिएशन च्या वतीने मजूर नोंदणी आणि योजनांची माहितीसाठी जागृती  अभियान राबविण्यात येत असून याला मजुरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे  तरीही अजूनही वंचित राहिलेल्या मजुरांची नोंदणी करण्यासाठी संघटनेची बैठक संपन्न झाली असून  आता शहरांतील प्रत्येक वॉर्डात  कँप आयोजित करणार असल्याचा संकल्प  आज बैठकीत करण्यात आला यावेळी संघटना चे अध्यक्ष  शैलेश सूर्यवंशी, सतीश वाघ,पंचशील गजघाटे  ,अनुराधाताई  ढिसाळे, बशीर खान,सतिष  वाघ ,गणेश नृपणारायन,जहिरसिद्दीकी, सुनील राऊत,संतोष सोळंके,संतोष उमाळे, केशव मेश्राम, संजय  इंगोले,राजू चव्हाण, प्रकाश वाडे, भास्कर सोनोने,राजू किर्तक,सतिष नागदेवे,सैय्यद जावेद,देवानंद गोपणारायन,मो रफिक,अनिल एलकर,सुनील तायडे, गजानन राऊत,वैभव वाघ,विनोद रामटेके,अक्षय  ढिसाळे,विशाल घायवट, अक्षय सूर्यवंशी,अजिंक्य सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती


कोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या