*जुने शहर खुपिया पथकाची कारवाई किंमत 8870/- चा मुद्देमाल सह दारू जप्त*
दिनांक: 24/10/2021
अकोला: जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या विशेष खुपिया पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर आज दि, 24 ऑक्टोंबर 2021 रोजी खुपिया पथक अकोला यांना गुप्त माहिती खात्रिशिर खबर मिळाली की, भारत-पाकिस्तान क्रिकेटमॅच चालू असताना आरोपी संतोष अंकुसिंग ठाकूर वय 45 वर्ष, रा. हरिहर पेठ अकोला हा जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील त्याच्या राहत्या घरी हरिहर पेठ येथे इंग्रजी दारू विकत आहे.
अशी गुप्त माहिती मिळाली त्यावरून आरोपीला पंचा समक्ष दारूची नावे आयबी बॉटल, मेकडॉल नंबर वन, किंगफिशर असा वेगवेगळ्या कंपनीच्या इंग्रजी दारू एकूण माल 8870/- रुपयाचा बिना परवाना अवैधरित्या माल हा आरोपी संतोष ठाकूर यांच्या कडून विक्री करत असल्यामुळे जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई कायदयाचे अन्वय गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे ही कारवाई जुने शहर पोलीस स्टेशन ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या खुपिया पथका खात्रीशीर गुप्त माहितीवरून हेड कॉन्स्टेबल अनीस खान, पोलीस कॉन्स्टेबल धनराज, पोलीस नाईक रतन दंदी, हेड.कॉ. महेंद्र बहादुरकर, हेड कॉन्स्टेब बसांबे, निखाडे, दामलकर, इंगळे यांच्या पथकाने केली आहे
0 टिप्पण्या