Ticker

6/recent/ticker-posts

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध शेतकरी चळवळ - आ. रणधीर सावरकर

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध शेतकरी चळवळ - आ. रणधीर सावरकर


अकोला
सामाजिक दायित्व, मानवता इच्छाशक्ती सोबत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध शेतकरी चळवळीतले अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज संवेदनशील , कर्तव्य याचा परिचय देत निवडणूक प्रचारात मतदारांनी सांगितलेल्या  अडचणी  , अतिवृष्टीमुळे शेतकरी झालेला हवालदिल, निराश हतबल झालेल्या शेतकऱ्याला  बँका मदत करत नाही सर्व कागदपत्रं सादर केले असताना होणारा नाहक त्रास मानसिक व आर्थिक नुकसानाचा संदर्भात तक्रार केल्यावर आपला प्रचार दौरा अर्धवट  सोडून प्रथम शेतकरी व त्याच्या समस्या निराकरण याच्याकडे प्राथमिक तिने लक्ष केंद्रित करून त्यांना न्याय म्हणून दिल्यानंतरच प्रचार दौरा सुरू केला.


अकोला तालुक्यात अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार करत असताना    उमेश पागृत ,राजेश पागृत, विठृठल पागृत ,विजय पागृत, देविदास पागृत ,गनेश मुगटराव पागृत ,शरद पागृत ,वासुदेव पागृत ,गजानन पुरनाजी पागृत, रमेश दीनकर पागृत. या शेतकऱ्यांनी ग्रामीण बँकेत कडून होणारी अडवणूक व समस्या मांडल्या. आमदार सावरकर यांनी ताबडतोब आपले सहकारी राजेश बेले, बाळासाहेब  आपोतीकर अनिल गावंडे, अंबादास उमाळे, देशमुख यांच्यासह बँकेत डेरेदाखल होउन अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून ताबडतोब समस्या निराकरण करा. असे सांगितले अधिकाऱ्यांनी येत्या चार-पाच दिवसात शेतकऱ्यांना न्याय देऊ असे अभिवचन दिल्यानंतर शेतकऱ्यांचा समाधान झाल्यावर आमदार सावरकर पुढच्या दौऱ्यावर गेले. ही त्यांची कार्य प्रणाली जनतेविषयी आस्था संवेदना व जनतेचा विश्वास हे भाजपा लोकप्रतिनिधी ची ताकत असल्याचा प्रत्यय आला.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या