Ticker

6/recent/ticker-posts

*जुने शहर पोलिसांनी वाचवले एका महिलेचे प्राण

*जुने शहर पोलिसांनी वाचवले एका महिलेचे प्राण


*लोखंडी पुलावरून घेणार होती महिला उडी


दिनांक 30 सप्टेंबर 2021
अकोला जुने शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस वाहन घेऊन पोलीस मुख्यालयात जात असताना एक महिला 47 वर्ष राहणार शिवनगर जुने शहर अकोला येथील ऑटो ड्रायव्हर यांची पत्नी ही महारणाप्रताप बगीच्या लगत जय हिंद चौकाकडे जात असलेल्या रस्त्या मधील लोखंडी पुलावरून आत्महत्या करत असल्याचे संशय आल्याने  क्षणाचाही विलंब न करता या महिलेला शेख रशीद बक्कल नंबर ३२३ खुफिया विभाग आणि पोलीस वाहन चालक  प्रदीप वानखडे बक्कल नंबर ४१६ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जुने शहर अकोला पोलिस स्टेशन मधील यांनी त्या महिलेला लोखंडी पुलावरून उडी घेण्यापूर्वीच महिलेचा हात ओढला व बाजूला करून त्या महिलेचे प्राण वाचविले


 हे करत असताना त्यांच्या समवेत वाहन चालक प्रदीप वानखडे  ए एस आय यांनी या महिलेला विचारपूस करून सुखरूप घरी पोचवण्यात मदत केली आणि या महिलेचे प्राण वाचवले सद्रक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे या ब्रीद वाक्य चे नुसार जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात शेख रशीद, प्रदीप वानखडे यांनी महिलेचे प्राण वाचलेल्याने अभिमानास्पद कार्य केल्यामुळे सर्वत्र जुने शहरातील पोलीस ठाण्यात व परिसरातील नागरिकाकडून या पोलिसांचे कौतुक होत आहे.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या