Ticker

6/recent/ticker-posts

सनदी लेखापालांच्या वेस्टर्न इंडिया कौन्सिल पदाधिकार्‍यांची आज महानगरात बैठक

सनदी लेखापालांच्या वेस्टर्न इंडिया कौन्सिल पदाधिकार्‍यांची आज महानगरात बैठक


अकोला - दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल मुंबईच्या कार्यकारणी मंडळातील सदस्यांचे आज मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी अकोला शाखेत आगमन होत आहे. यात कौन्सिलचे चेअरमन सीए मनीष गादीया, व्हॉईस चेअरपर्सन सीए दृष्टी देसाई, सचिव सीए अर्पित काबरा, कोषाध्यक्ष सीए जयेश काला, विकासा चेअरमन सीए यशवंत कासार, कौन्सिलचे सदस्य सीए उमेश शर्मा व सीए अभिजित केलकर तसेच सेंट्रल कौन्सिल सदस्य सीए दुर्गेश काबरा आदी पदाधिकारी उपस्थित होत आहेत. तोष्णीवाल ले आऊट परिसरातील सीए भवन येथे रिजनल कौन्सिलचे पदाधिकारी हे सनदी लेखापाल व विकासाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सनदी लेखापाल व विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात येऊन त्या दृष्टीने विचारविनिमय या बैठकीत करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात येणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत होत असणाऱ्या या उपक्रमासाठी अकोला शाखा अध्यक्ष सीए केयूर देढीया, उपाध्यक्ष सीए हिरेन जोगी, सचिव सीए जलज बाहेती, कोषाध्यक्ष व विकासा चेअरमन सीए दीपक अग्रवाल, कार्यकारणी सदस्य गौरीशंकर मंत्री व अकोला विकासा समितिच्या सदस्य आदी परिश्रम घेत असल्याची माहिती जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सीए रमेश चौधरी यांनी दिली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या