Ticker

6/recent/ticker-posts

सर्वात मोठ्या अंकगणित प्रज्ञा स्पर्धेच्या ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ

सर्वात मोठ्या अंकगणित प्रज्ञा स्पर्धेच्या ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ

पंधरा लाख रुपयांची पंचवीस हजार बक्षिसे 

पंधरा लाख रुपयांची पंचवीस हजार बक्षिसे 
  अकोला- शालेय मुलांमध्ये गणिता विषयीची गोडी व आवड निर्माण करणे व त्यांच्या अंकगणीतीय क्षमतेची चाचणी घेऊन,अंकगणीतीय क्षमता व कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या चेन्नईच्या एसआयपी अकादमीच्या वतीने आयोजित अ.भा. अंकगणीतीय प्रज्ञा(अर्थमॅटिक जिनियस) स्पर्धेचे सहावे पर्व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व खुल्या पद्धतीने आयोजित करण्यात आले असून स्पर्धेच्या ऑनलाइन नोंदणीस नुकताच प्रारंभ करण्यात आला.  
 या अभिनव स्पर्धेसाठी शाळाही आपल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे नोंदणी करण्यासाठी पात्र असून या स्पर्धेच्या कोणत्याही फेरीसाठी कोणत्याही स्वरूपात शुल्क आकारले जाणार नाही.इयत्ता,दुसरी,तिसरी,चवथी  आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन स्वतंत्र गटात सदर स्पर्धा योजण्यात आली आहे. प्रत्येक गटातील राष्ट्रीय विजेत्यांना (तिसरी व अंतिम फेरी) अनुक्रमे 25 हजार रुपये,15 हजार रुपये,आणि 10 हजार
 रुपयाची बक्षिसे देण्यात येणार असून विभागीय स्तरावरील दुसऱ्या फेरीतील प्रत्येक गटातील विजेत्यांना 10 हजार,7 हजार व 5 हजार रुपयाची बक्षिसे आणि स्मृती चिन्हे दिली जाणार आहेत. 


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.sipcontest.com या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी स्वतंत्रपणे सदर पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांना सर्वोत्कृष्ट स्कूल चॅम्पियन हा किताब व  विभागीय स्तरावर रुपये पंधरा हजार रुपयांचे रोख बक्षीस व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी शाळानी स्वतंत्रपणे नोंदणी करणे आवश्यक आहे.स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील शाळेच्या एकुण सहभागी विद्यार्थ्यांच्या एकुण गुणांच्या आधारावर स्कूल चॅम्पियन निवडला जाणार आहे,दुसऱ्या फेरीसाठी प्रत्येक सहभागी शाळेतील 20 विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. विद्यार्थ्यानी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना पोर्टलवर चार सराव पेपर देण्यात येणार असून विद्यार्थ्याना हसत खेळत आनंददायी गणित या विषयावर कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.सदर कार्यशाळा मोफत असून कार्यशाळेत सहभागी झाल्यावर अतिरिक्त सहा सराव पेपर विद्यार्थ्याना उपलब्ध होणार आहेत.  
या स्पर्धेचे या पूर्वीचे चार पर्व आंतरशालेय पद्धतीने संपन्न झाले होते.गेल्या वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन देश पातळीवर करण्यात येत आहे.देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरूनच एस.आय.पी. अकादमीच्या वतीने या राष्ट्रीय प्रज्ञा परिक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एस.आय.पी.अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश व्हिक्टर यांनी दिली.व्हिक्टर हे मुंबई आय.आय. टी.व आय.आय.एम.,अहमदाबाद येथील उच्च पदवीधर असून,लहान मुलांच्या कौशल्ये विकासाच्या दृष्टिकोणातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी चेन्नई येथे एस.आय. पी.अकादमीची स्थापना केली आहे. स्पर्धेच्या पहिला टप्पातील चाचणी अकादमीच्या स्थानिक केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन योजली जाणार आहे, या पहिल्या टप्प्यातील शीर्षस्थ 20  विद्यार्थ्यांना इयत्ता - 2 (पाच) इयत्ता  3 (पाच), इयत्ता  4 (पाच),इयत्ता 5 (पाच) दुसऱ्यात फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र दिले जातील आणि विजेत्यांना आकर्षक मेडल्स  (पदके) प्रदान केली जाणार आहेत. 


त्याचप्रमाणे जर शाळांनी  स्वतंत्र किंवा एस. आय. पी केंद्रा मार्फत नोदणी केली असेल तर प्रत्येक शाळेचे दुसऱ्या फेरीतील शीर्षस्थ 12  विद्यार्थी इयत्ता-2 (तीन), इयत्ता-3 (तीन), इयत्ता-4 (तीन), इयत्ता -5 (तीन ) अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तिसरी आणि अंतिम फेरी डिसेंबरमध्ये चेन्नई येथील केंद्रीय कार्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र नन्नवरे- मो. क्र.9823106663  ( खांदेश ,मराठवाडा आणि विदर्भ विभाग प्रमुख, प्रदीप शेंद्रे –नागपूर( विदर्भ विभाग प्रमुख)  : 9673098786, सागर गुळे विभागीय सहप्रमुख, खांदेश ,मराठवाडा औरंगाबाद: मो. क्र 9870447314 / विवेक सुनटकरी औरंगाबाद 9511685934 यांचेशी संपर्क साधण्याचेआवाहन राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या