माझे शहर माझी जवाबदारी"अभियानाचे उद्या चतुर्थ स्वच्छता अभियान
अकोला- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाची कास धरीत प्रत्येक रविवारी कोरोना निर्देशांचे पालन करीत महानगरातील प्रत्येक परिसरात सामूहिक स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविणाऱ्या "माझे शहर माझी जवाबदारी"च्या या अभियानाचा चतुर्थ टप्पा आज रविवार दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी महानगरात आयोजित करण्यात आला आहे.या अभियानात अनेक स्वयंसेवक कचरा नेण्याची वाहने व झाडू,टोपली,फावडे हातात घेऊन ठिकठिकाणी सामूहिक स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविणार आहेत.गत महिन्यापासून सुरू झालेल्या या अभियानाला शहरप्रेमी व्यावसायिक,विधिज्ञ कलाकार,उद्योजक,शिक्षक, प्राध्यापक, नागरिक,युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अभियानात सहभाग घेत आपल्या नावाची नोंदणी करून आपणास प्रत्येक रविवारी या अभियानात बोलावण्याची सूचना केली.या अभियानात सहभागी होण्यासाठी शहर प्रेमी महिला,पुरुष स्वयंसेवकांनी अमित ठाकरे मो. न. 8208274875 यांचेशी संपर्क करून या अभियानात सहभागी होण्याची विनंती या अभियानाचे संयोजक पंकज जायले यांनी केली.
0 टिप्पण्या