दापुरा केंद्राची पहिली ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न
अकोला:
आज दिनांक 29 जुलै 2021 ला समूह साधन केंद्र दापुराची पहिली ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री श्रीकृष्ण गावंडे सर यांनी केले. प्रस्ताविकातून सेतू अभ्यासक्रमांची गरज काय व तो का, व कसा राबवायचा याबद्दल सरांनी माहिती दिली.
राजेंद्र पाटोळे यांनी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, उद्दिष्टे, व पार्शवभुमी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवण्याचा दुवा म्हणजे सेतू अभ्यासक्रम होय. असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांना समजावून दिले.जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने दिलेल्या वेळापत्रकानुसार मराठी व इंग्रजी या विषयाचा सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी करायची, अध्ययन निष्पत्ती, त्यासाठी अध्ययन अनुभव कसे द्यायचे याविषयी सविस्तर चर्चा केली व शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर केला. नरेश तायडे सर विषय शिक्षक रामगांव यांनी गणित व सामाजिक शास्त्र या विषयाचा सेतू अभ्यासक्रम कसा पुर्ण करून घ्यावा व त्यासाठी आपल्याला कसे अध्ययन अनुभव निवडावे लागतील याविषयींचे मार्गदर्शन केले. सेतू अभ्यासक्रमच्या पायऱ्या समजावून सांगितल्या.सविता खिल्लारे मॅडम यांनी विज्ञान विषयाचा सेतू अभ्यासक्रम कसा मुलांकडून पूर्ण करून घ्यावा. मुलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करावा. विज्ञानाची क्षेत्र निवडून त्यासाठी अध्ययन अनुभवांची सांगड कशी घालावी याचे क्षेत्रनिहाय मार्गदर्शन केले.
श्रीकृष्ण गावंडेनी चाचण्याच्या नोंदी कशा ठेवायच्या, दैनंदिन अध्ययन, अध्यापणाच्या नोंदी कशा ठेवायच्या त्यांच्या नमुन्याची सविस्तर चर्चा करून सर्वांच्या शंकाचे समाधान केले. वसेतू अभ्यासक्रमाची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी असे सर्वाना आवाहन केलेया प्रथम शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनातून सर्व शिक्षक बांधवाना सेतू अभ्यासक्रम कसा राबववा याची दिशा मिळाली.या शिक्षण परिषदेसाठी जि प, शिक्षकांसोबत केंद्रातील खाजगी शाळेतील सर्वच शिक्षक सहभागी झाले होते. आ. पेठे सर, अनिस सर, सोळंके मॅडम, भदे सर, पांडे मॅडम, जेष्ठ शिक्षिका आ. आशाताई पिसे पाटिल यांच्या सह BRC च्या आ. अर्चनाताई भगत मॅडम, आ.दुर्गा सोळंके यांच्यासह केंद्रातील 50 शिक्षकांनी शिक्षण परिषदेत सहभाग नोंदवून सहकार्य केले.पहिली शिक्षण परिषद या शैक्षणिक सत्रासाठी मार्गदर्शक ठरली.आभार प्रदर्शनाने परिषदेची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या