Ticker

6/recent/ticker-posts

झाड लावून साजरा केला वाढदिवस

झाड लावून साजरा केला वाढदिवस


अकोला - आपण पोटात असताना नऊ महिने ऑक्सिजन देते ती आपली पहिली आई व मरेपर्यंत जे वृक्ष आपल्याला फुकट ऑक्सीजन देतात तो आपली दुसरी आईच, त्यामुळे प्रत्येकाने वाढदिवस झाड लावून साजरा करावा, असे प्रतिपादन वृक्ष क्रांतीचे जनक ए. एस. नाथन यांच्या पासून प्रेरणा घेऊन शोभीत प्रज्ञानंद थोरात याने आपला वाढदिवस वृक्ष लाऊन साजरा केला•
     एक झाड आपणास दहा वर्ष पुरेल इतका ऑक्सीजन देते, त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात किमान बावीस झाडे लावली पाहिजेत. प्रत्येक नागरिकांनी आपला वाढदिवस किमान एक वृक्ष लावून साजरा करायचा हवा• वृक्ष ही मानवाची मित्र आहेत, ती आपल्याला मदत करतात तशीच आपणही त्यांना जप्वे आणि त्यांचे संरक्षण करावे• हे आपले आद्य कर्तव्य असावे• प्रत्येक वाढदिवस झाडे लावून साजरा करा असा संदेश, शोभीत चे माता पिता यांनी नागरीकांना केले आहे• शोभीत चे पिता अकोला येथे शिक्षक आणि प्रत्रकार आहेत•


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या