Ticker

6/recent/ticker-posts

व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा- वंचित

व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा- वंचित 


पातूर ( प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे.). अपमान कारक व बदनामीचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट, प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध अत्यंत बदनामीचे पोस्ट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले असता पातुर येथील विजय समाधान बोरकर सामाजिक कार्यकर्ता यांनी दोन नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक अकोला आणि पोलीस स्टेशन पातुर येथे पोस्ट केलेल्या च्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 व 196, 357, तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3 ( 1 ) ( r ) 3 ( 1 ) ( s ) अंतर्गत गुन्हे दाखल करावे. अशी मागणी तक्रार मध्ये केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांचा आरोप आहे . द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी, विदर्भाचं राजकारण फेसबुक पेज, महाराष्ट्राचा विश्वास फेसबुक पेज, देवा भाऊ फेसबुक पेज, वर्धा लाईव्ह, यांच्यावर एडवोकेट प्रकाश आंबेडकर युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्या विरोधात अपमान कारक व्हिडिओ प्रसारित केले आहे त्यामुळे समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत . म्हणून या सर्वावर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे असे तक्रारी त नमूद केलेले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या