सर्वोपचार रुग्णालय येथे अभ्यागत समितीची बैठक
16 ऑक्टोबर 2025 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे अभ्यागत समितीची बैठक झाली या बैठकीला उपस्थित अध्यक्ष श्री रणधीरजी सावरकर ,आमदार अकोला पूर्व सदस्य श्री खासदार अनुप भाऊ धोत्रे ,श्री गिरीशजी जोशी सदस्य श्री किशोर जी मालोकार, श्री शंकररावजी वाकोडे श्री देवाशीष काकड, सौ उज्वलाताई धबाले, डॉक्टर अमित कावरे श्री पवन जी महल्ले श्री धनंजय धबाले, वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता डॉ श्री संजयजी सोनोने, वैद्यकीय अधीक्षक डॉ श्री शिरसाम, डॉ श्री नेताम, डॉ श्री अष्टपुत्रे , डॉ श्री अरविंद आढे, व इतर विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
बैठकीमध्ये रुग्णांच्या उपचारासंबंधी सर्व विभागाच्या समस्या ऐकून त्यावर अध्यक्ष महोदयांनी व खासदार महोदयांनी काही उपाययोजना सांगितल्या व काही सूचना सुद्धा केल्या जुनी इमारत पाडून नवीन इमारतीसाठी जे काही करता येईल त्यासाठी पीडब्ल्यूडी आणि जीएमसी यांचे समन्वय बैठकीमध्ये घेण्यात आले स्वच्छता सुरक्षा व महानगरपालिकेतर्फे काही अडचणी ज्या बैठकीमध्ये आल्या त्या सोडवण्यासाठी अध्यक्ष महोदयांनी पुढाकार घेऊन सर्व समस्या सोडवण्याचे काम केले पदभरती संबंधी काही अडचणी असल्यास शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन सुद्धा माननीय अध्यक्ष श्री रणधीरजी सावरकर व खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी दिले,



0 टिप्पण्या