Ticker

6/recent/ticker-posts

पोहण्यासाठी आलेले तीन युवक गेले वाहून एक बेपत्ता, दोन सुखरूप

पोहण्यासाठी आलेले तीन युवक गेले वाहून एक बेपत्ता, दोन सुखरूप


प्रतिनिधी- गुलाब भाऊ अंभोरे
पातूर तालुक्यात येत असलेले पिंपळखुट्टा हे गाव मन नदीच्या काठावर बसलेले आहे. सध्या सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. आज ३०‌ ऑगस्ट २५ रोजी ३ युवक पिंपळखुट्टा येथील मन नदीत होण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन चांन्नी यांना मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन जलद गतीने नदी काठाने तपास सुरु केला असता, ३ युवक पैकी २ युवक गावापासून दीड ते दोन किलो मिटर अंतरावर नदी किनाऱ्यावर सुखरूप मिळून आले. परंतु त्यातील एक युवक करण वानखेडे वय २२ वर्ष राहणार पिंपळखुट्टा हा  सापडल्या नसल्यामुळे गावकरी व पोलीस यांनी चांगेफळ , शहापूर, या सर्व नदी परिसरात शोध घेतला असता तो युवक मिळून आला नाही. सदर युवकाला शोधण्यासाठी पोलिस शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. पिंपळखुट्टा व परिसर मध्ये हळहळ वेक्त होत आहे. पोलीस निरीक्षक  रवींद्र लांडे, पो. सुनील भाऊ भाकरे, पो. अनिल सोळंके, दिनेश झटाले, शिवानंद स्वामी व शोधक पथक पुढील तपास करीत आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या