अंधार-सांगवी येथे दारू भट्टीवर छापा,जप्त केलेला मोह केला नष्ट
पातूर प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे
पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेले चानी येथील पोलिस यंत्रणा एकशन मोडमध्य आलेली असून, ठीक ठिकाणी अवैध धंदे वर रेड टाकून पोलिस खाकी वर्दीचा हिसका दाखवीत आहेत. पोलिस स्टेशन चांनी हदितील ग्राम अंधार - सांगवी शेत शिवरातील गावठी हातभट्टी लाऊन अवैध दारू काढणारा इसम ब्रम्हदेव लथाड वय ३० वर्ष राहणार अंधारसांगवी येथे गुप्त माहिती नुसार चानी पोलिस यंत्रणा सा.पो. नीं. रविंद्र लांडे, पो. हेडकॉन्स्टेबल गजानन जायभाय, पो. दिनेश झटाले, पो. अमलदार सुनील भाकरे, सुदर्शन चौरे, शिवानंद स्वामी, या सर्वांनी १२ ऑगस्ट ला ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी माननीय उपविभागीय पो. अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली अंधार सांगवी जंगलात रेड टाकून सडलेली मोहाने भरलेली एकूण डब्बे ४२ किंमत अंदाजे ४२ हजार रू. व गावटी दारू २५ लिटर किंमत २५०० व इतर साहित्य असा एकूण ४४ हजार ५०० रू. मुद्देमाल जप्त करून आरोपी ब्रम्हदेव लथाड आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारू बंधी अधिनियम कलम ६५,( क) ( ड) ( फ) अनवे गुन्हा नोंद करण्यात आला. अशी पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली.



0 टिप्पण्या