हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता' मोहिमेला प्रारंभ
तेल्हारा
हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता अभियान मोहीम ची तेल्हारा शहरात प्रभावीपणे राबविण्यात येत असून सर्व नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2025 हे तीन दिवस फडकविणे अभिप्रेत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी फुलपाखरू शहर स्तर संघ च्या अध्यक्ष संगीता विजय देशमुख सचिव रेखा पृथ्वीराज चव्हाण, मनीषा प्रशांत देशमुख वस्ती स्तर संघ अध्यक्ष, मीनाताई विलास बासोडे, वंदना हेमंत देशमुख, वर्षा पवार crp तेल्हारा तसेच नोडल अधिकारी हिरालाल अग्रवाल, शंतनू वक्ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी, विलास पोहरकार लेखाधिकारी, चेतन्य देशमुख कर निरीक्षक, विजय आडे, श्रीकृष्ण पोहरकर, संजय चौकणे समस्त नप कर्मचारी सहभागी आहेत तरी सर्व राष्ट्रप्रेमी यांनी नजीक च्या तिरंगा विक्री केंद्रा वरून तिरंगा विकत घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करावा.
तिरंगा विक्री केंद्र: विजय आडे, श्रीकृष्ण पोहरकर , उद्धव पोहरकर नगर परिषद तेल्हारा यांच्या कडे विक्री करिता उपलब्ध आहे. मीनाताई बासाडे माई महिला बचत गट ,ओम नगर तेल्हारा यांच्या कडे विक्री करिता उपलब्ध आहे तसेच समस्त नागरिकांनी सदर उपक्रमात आपला सहभाग नोंदविण्याबाबत सतीश गावंडे मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांनी आवाहन केले आहे


0 टिप्पण्या