Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवड

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवड


अकोला 
 ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे अध्यक्ष खासदार अनुप धोत्रे यांनी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत मागासवर्गीय आदिवासी, महिला संघटनेमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 
समितीचे सदस्य समिती म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते व ग्रामीण भागामध्ये काम करणारे डॉक्टर राजेश पांडुरंग नागमते, मागासवर्गीय क्षेत्रामध्ये काम करणारे श्रीकृष्ण शालिग्राम चव्हाण, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणारे विजय सिंग शंकर सिंग सोळंके, महिलांमध्ये काम करणाऱ्या माजी नगरसेविका सौभाग्यवती सिंधुताई किशोर मालोकार यांची समितीमध्ये निवड करण्यात आली आहे या सर्वांचे स्वागत अभिनंदन विविध क्षेत्रांमध्ये होत असून शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या समितीमध्ये विविध क्षेत्राच्या सर्वसामान्यांचे संवेदना जाणणारे जनतेमध्ये  राहणारे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवड खासदार अनुप धोत्रे यांनी केली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या