Ticker

6/recent/ticker-posts

कावड यात्रा सोहळ्यामध्ये शिव भक्तांना मिळणार सुवीधा

कावड यात्रा सोहळ्यामध्ये शिव भक्तांना मिळणार सुवीधा


अकोला
 महाराष्ट्रातील सर्वात मोठी कावड यात्रा राज राजेश्वर मध्ये निघत असते. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पालखी सोहळ्यामध्ये शिव भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ देता कामा नये. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार शिव भक्तांच्या भक्ती आणि श्रद्धेला नमन करीत असून या साठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही असा शब्द भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी दिला.


 अकोला शहरातील सांस्कृतिक, ऐतिहासिक भक्ती आणि मानवतेचे प्रतिक असलेली महाराष्ट्रातील कावड यात्रा सतत २४ तास चालणारी व दर सोमवारी १९ की.मी. पाई चालत पूर्णा मायच्या जालाभीशेकाने ग्राम दैवत राज राजेश्वर यांना प्रसन्न करण्याची परंपरा असून या परम्परेअन्तर्गत व्यवस्था , रस्ते, व शिवभक्तांच्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी शिव्भाक्तांसोबत आमदार रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे व भाजप नेत्यांनी संयुक्त रित्या पाहणी करून सोबत राष्ट्रीय महामार्ग, महानगर पालिका, वीज वितरण सार्वजनिक बांधकाम महसूल विभागाच्या अधिकार्यांना सोबत घेऊन प्रत्येक्ष पाहणी करून अडचणी समजून घेतल्या आणि ताबडतोप जुलै २४ तारखे आत संपूर्ण व्यवस्थ व सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे निर्देश दिले. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, ना.अजित दादा पवार जिल्ह्याचे पालक मंत्री ना. आकाश फुंडकर, या साठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. या वेळी भाजपा नेते विजय अग्रवाल, जयंत मसने, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे बागुल, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, अमोल डोईफोडे, वाकोडे, विठ्ठल देवकाते, अनिल बिडवे, दिनोडे, खुसे, मिश्रा, टापरे, राजेश सरप, गजानन घुंगे, श्रीकांत माणिकराव, अभियंता युसुफ मृणाली धंगारे आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी गांधीग्राम येथील रस्त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून २४ तारखे पर्यंत रस्ता रहदारीला उपयुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच विद्युत व्यवस्था अकोट फाईल ते पाचमोरी, गांधीग्राम येथे व्यवस्था तसेच साफसफाई संदर्भात सूचना देण्यात आल्या असून. अकोट फाईल ते पाचमोरी रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण तसेच रस्त्यावर असलेला कचरा त्वरित हटविण्याच्या सूचना मनपा अधिकार्यांना देण्यात आल्या. पाचमोरी समोरील रस्त्या संदर्भात अडचणी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार्यांना दाखविण्यात आल्या . आ. रणधीर सावरकर यांच्या सुचेने नंतर जिल्ह्य प्रशासनाने पावले उचलली परंतु त्याला गती देण्याचे निर्देश खा. अनुप धोत्रे यांनी दिले. या वेळी बाभळेश्वर, डाबकी रोड, राजराजेश्वर, खोले श्वर अनिकट, नटेश्वर, शिवभक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक सूचना केल्या त्यां प्राथमिकतेणे दूर करण्याचे आदेश आ. सावरकर यांनी दिल्या. या वेळी girish जोशी, पवन महल्ले, माधव मानकर, दिलीप नायसे, देवाशिष काकड, संजय गोटफोडे, संजय जोशी, दिलीप मिश्रा, santosh पांडे, अमोल गीते, नितीन राउत, कालीचरण अवस्ती, संदीप पवार, संदीप ठाकूर, अशुतोशी शर्मा, रणजीत खेडकर, तुषार भिरड, योगेश गोतमारे, मुन्ना उकडे, नात्तू पहेलवान, रमेश अलकरी, अंकुश गायकवाड, जय मिश्रा, कारण शाहू, पंकज मुराई, अक्षय थोरात, हरीश जंगम, गणेश माने, विवेक भरणे, ऋषी जगताप, santosh पांडे विक्की ठाकूर, वैभव मोरे, हर्ष चौधरी, कुणाल शिंदे, गोपाल मुले, राजेश वगरे, रुपेश काटे, दाता भरणे, मनोज वानखडे, निलेश निनोरे, सतीश ढगे, विलास शेळके, सुनील चौधरी, उज्वल बामनेत, बल्लू चौधरी, नवीन जाधव, राहुल लोहिया, संजय अग्रवाल, संदीप बात्हो, santosh अग्रवाल, रवी यादव, रवी आठवले, राजेश करिहार, डॉ. किरण ठाकरे, वसंत सोनटक्के, राजूभाऊ गोंदले, नटवर अहिर,ध्रुव खुणे, उमेश श्रीवास्तव, टोनी जयराज आदी सह मोठ्या प्रमाणात शिवभक्त समवेत होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या