Ticker

6/recent/ticker-posts

आ. पठाण यांनी कोणत्या हेड मध्ये निधी मागितला याची माहिती द्यावी- गिरीश जोशी

आ. पठाण यांनी कोणत्या हेड मध्ये निधी मागितला याची माहिती द्यावी- गिरीश जोशी


अकोला 
आमदार सादिक खान पठाण हे साधे अग्रसेन चौकातील गड्डा बुजवू शकले नाही, ते काय राजराजेश्वर मंदिरासाठी निधी आणू शकतात? असा सवाल भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी केला आहे. 
मोठा गाजावाजा करून अग्रेशन चौकात जाऊन खड्डा दोन तासात बुजवणार असे सांगणारे आमदार पठाण हे 482 तास झाल्यावर सुद्धा साधा गड्डा बोलू शकले नाही ते काय राजेश्वर मंदिराला 'ब'वर्ग दर्जा मिळवून देणार? असा सवाल करून गेल्या दोन वर्षात आमदार रणधीर सावरकर यांनी राजेश्वर मंदिराला 'ब'वर्ग दर्जा तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी आराखडा तयार करून पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आराखडा शासनाकडे दाखल केला. अकोला महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती विभागीय कार्यालय तसेच मंत्रालयातील 26 नंबरच्या कार्यालयात पासून 26 ठिकाणी फाईल फिरून सातत्याने पाठपुरावा करत होते. यासाठी राज राजेश्वर मंदिर देवस्थानची पदाधिकारी हे सातत्याने संपर्कात होते, हा इतिहास आहे आणि प्रसार माध्यमांनी या संदर्भातले सगळे वृत्त प्रकाशित केले आहेत. हा पुरावा असताना केवळ पत्रकार परिषद घेऊन वाजा गाजा करणे तसेच प्रश्न उपस्थित करणे म्हणजे आपण निधी आणला आहे आपण आल्याचा देखावा करणे ही स्वस्त पब्लिसिटी असून आमदार सावरकर यांनी 'ब'वर्गाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कामाला लागले आहे. आमदार पठाण यांनी कोणत्या हेड मध्ये निधी मागितला याचा आराखडा किंवा कागदपत्र पत्रव्यवहार पंधरा महिन्याचे जाहीर करावं असे आवाहन कर करून त्यांनी आपल्या लोकसभेमध्ये केलेले भाषण अकोलेकर विसरले नाही हे लक्षात ठेवावे अशीही गिरीश जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

आ. रणधीर सावरकर यांची माहीती....


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या