Ticker

6/recent/ticker-posts

नविन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्विकारला पदभार

नविन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्विकारला पदभार


अकोला
पोलीस अधीक्षक बच्चन सिंह साहेब यांची नुकतीच रामादेशक राज्य राखीव बल गट क्रमांक ४ नागपुर येथे अकोला जिल्हयातुन बदली झाली आहे. आज नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक, श्री. अर्चित चांडक यांनी अकोला जिल्हयाचा पोलीस अधीक्षक, पदाचा पदभार स्विकारला. त्या निमित्याने आज दिनांक २३ मे २०२५ मावळते पोलीस अधीक्षक व नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांचा निरोप व स्वागत समारंभाचे आयोजन विजय हॉल येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी तसेच शाखा प्रभारी हे उपस्थितीत होते.


कार्यक्रमाव्या सुरवातीला मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक चांडक यांचे स्वागत केले. नविन पोलीस अधीक्षक यांनी पदभार संभाळत जुन्या पोलीस अधीक्षक यांना निरोप दिला. दोन्ही सत्कारमुर्ती यांचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी स्वागत केले स्वागता नंतर कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री सतिश कुळकर्णी उपविभागीय पोलीस अधीकारी यांनी केले. त्यानंतर पोलीस स्टेशन प्रभारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनतर सत्काराला उत्तर देतांना पोलीस अधीक्षक यांनी अकोला जिल्हयातील कार्यकाळात चांगली टीम लाभली लोकसभा, विधानसभा, सोबतच महत्वाचे बदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राखने टीम मुळे शक्य झाले असे मत व्यक्त केले. नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांनी सुदधा आपले मत व्यक्त करतांना सर्वानी एकमेकासोबत समन्चय साधुन आपले कर्तव्या पार पाहुया अशा अपेक्षा व्यक्त केल्या. आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक मनोज केदारे यानी केले



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या