पातुर मधे अवैध विट्टभट्टा अवैध माती कोणाच्या आशीर्वादाने?
पातूर तालुका प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे
अवैध विट्टभट्टा अवैध माती कोणाच्या आशीर्वादाने? पातूर तहसील कार्यालय पातूर अंतर्गत विट भट्टा जोमात सुरू तसेच अवैध बिना परमिशन चे वीटभट्टी सुरु दिसतात. तहसील कार्यालयातून पातूर तालुक्यातील विट्टभट्ट ची माहिती मागितली असता. कागदोपत्री फक्तं 12 लोकांची तालुक्यातून नावे मिळाली. तालुक्यामध्ये अंदाजी 50 विट भट्टे सुरु असतील मातीचे उत्खनन, कोठून दिले जाते. याच्या रॉयल्टी कोणी चेक करते की नाही का? याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे, असा सवाल उपस्थित होते.
या मागे कोण आहे, चर्चा उद्धान आले. पातूर तहसील चे तहसीलदार डॉक्टर राहुल वानखेडे पातूर तहसील ला लाभलेले आहेत. मुरूम उत्खंनन, रेती उत्खनन, माती उत्खनन कारवाया केलेल्या दिसतात. कारण त्यांच्याच ऑफिस ला त्यांच्या समोर एक पाटी लावलेली आहे की - मी माझ्या पगारात समाधानी अहो. मग या अवैध विटभट्टा कडे दुर्लक्ष का? ज्या ठिकाणी अवैध माती चे उत्खनन केले जाते तेथील अशा ठिकाणी तेथील तलाठी जबाबदार असतो. त्याच्या आशीर्वादाने हे सर्व चालते. पातूर चे तहसीलदार यांनी कोणत्या गावामधे किती अवैध विटभटा सुरु आहेत याची तात्काळ माहिती घेऊन अशांवर दंडात्मक कारवाई करावी. शासनाचा कोटी रुपयेचां महसुल बुडवणारावर कारवाही झालेली दिसत नाही. आता या गोष्टीकडे तहसील कार्यालय कोणती कारवाही करेल सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
0 टिप्पण्या