गुड फ्रायडे निमित्त माउंट कार्मेल चर्च, अकोला येथे प्रार्थनेचे आयोजन
अकोला
गुड फ्रायडे हा दिवस समस्त ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूस मरणाची आठवण केली जाते. हा दिवस सर्व ख्रिस्ती बांधव मोठ्या भक्ती भावाने प्रार्थनेमध्ये साजरा करतात. अकोला शहरातील माउंट कार्मेल चर्च येथे मोठ्या भक्ती भावाने हा दिवस साजरा करण्यात आला. ह्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा सोहळा नाट्यमय रीतीने सादर करण्यात आला. अनेक युवक युवतींनी व अन्य भाविकांनी या प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला. जॉय गावंडे ह्या युवकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची भूमिका साकारून खांद्यावर क्रूस घेऊन येशूप्रमाणे दुःख यातना सहन केली.
या प्रार्थनेमध्ये अकोला शहरातील अनेक ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतला. फादर रुपेश अँड्र्यु डाबरे यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंतिम सात वचनावर आधारित भाविकांना मार्गदर्शन केले. प्रभू येशू ने ज्याप्रमाणे मरतेवेळी देखील आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली व संपूर्ण जगाला क्षमेचा, प्रेमाचा, शांतीचा व त्यागाचा संदेश दिला, त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये बंधुप्रेम साकारून एक उत्तम जीवन जगावे असे मार्गदर्शन त्यांनी केले.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या