Ticker

6/recent/ticker-posts

70 फुट खोल विहरीतुन कुंजलेला मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या रेस्क्यु टीम ने बाहेर काढला

70 फुट खोल विहरीतुन कुंजलेला मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या रेस्क्यु टीम ने बाहेर काढला

वाशिम
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रेस्क्यु टीम ने 70 फुट विहिरीतील कुंजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह मोठ्या शिताफीने कल्पकतेतून पोलीसांना बाहेर काढून दिला


आज 7 मार्च 2025 दुपार चे सर्च ऑपरेशन, वाशिम जिल्ह्य़ातील मंगरूळपीर तालुक्यात असलेल्या कोठारी येथील शेत शिवारातील एका शेतातील विहिरीत कुंजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना दिसत असल्याची माहीती मंगरूळपीर पोलीसांनी पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना देऊन मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यासाठी पाचारण केले तेव्हाच जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव सर,तहसीलदार शितल बंडगर मॅडम, जि.आ.व्य. अ. शाहु भगत साहेब यांना माहीती देऊन लगेच आपली मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरुळपीर चे अतुल उमाळे,गोपाल गीरे,लखन खोडे,अपुर्व चेके,दत्ता मानेकर,पंकज जटाळे यांना शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना केले जागेवरील सिचवेशन पाहता विहीर ही अं.50 फुट खोल आणी 20 फुट पाणी खडतर अवस्थेत होती यात मृतदेह हा कुंजलेल्या अवस्थेत होता आणी हा मृतदेह आहे त्याच अवस्थेत काढायचा होता यामुळे आपल्या कल्पकतेतून रेस्क्यु टीम ने जसाच्या तसाच मृतदेह पोलीसांना बाहेर काढून दिला यावेळी मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे पिएसआय ज्ञानेश्वर धावळे साहेब,पो.काॅ.अमोल वानखडे,होमगार्ड मयुर मनवर हे तसेच कोठारीचे पो.पा.सतीश क्षीरसागर, सरपंच सुदर्शन गुंडे,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर हीमगीरी,हे उपस्थित होते अशी माहीती पो.काॅ.अमोल वानखडे यांनी दीली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या