क्रिकेट व इतर खेळावर चालणारा Online सट्ट्यावर छापा, एकुण ३३ आरोपी जागा मालकासह ताब्यात
अकोला
क्रिकेट व इतर खेळावर चालणारा Online सट्ट्या साठी ID तयार करून बेटींग करणारी आतंरराज्यीय गॅग स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे ताब्यात घेतली असून एकुण ३३ आरोपी जागा मालकासह ताब्यात घेऊन एकुण २८ लाख ३६ हजार २६५रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे कातखेड शिवारातील घरामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंगवर छापा टाकून आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात झाली असून जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास लसीबी अकोला करीत आहे.
काल दिनांक १८. ०२. २०२५ रोजी शंकर शेळके, पोलीस निरीक्षक LCB यांना गोपनीय माहीती मिळाली पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीतील ग्राम येवता ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात रविंद्र विष्णुपंत पांडे याचे शेत असुन त्या शेतात गहु पेरलेला असुन विटा सिमेंटने पक्के बांधकाम केलेली तीन मजली इमारत असुन या ईमारतीचा पहिल्या व दुस-या मजला येथे काही इसम मोबाईल, लॅपटॉप द्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैश्याचे हारजितचा ऑनलाईन खेळ खेळवित आहे.
अशा माहितीवरून मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा. यांचे मार्गदर्शनाने अधिकारी व पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जावुन रेड कारवाई केली असता तेथे एकुण ३३ आरोपी मिळुन आले. यातील आरोपी यांनी Fairplay (URL link https://admin.fairplay24.in/login, 100 Panal Depos0241 (URL link 100panel.com/login), अशा प्रकारचा Webapp चा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कसिनोगेम, पेड ऑनलाईन गेम, ईत्यादी गेम चा हॅट्सअप, टेलीग्राम ईत्यादी सोशल मिडीया ग्रुपवर जाहिरात करून ग्राहकाकडुन ऑनलाईन फोन पे द्वारे पैसे घेवुन त्यांची आयडी बनवुन त्यांना पैश्याप्रमाणे Web ID वर अॅड करून सट्टा खेळवुन जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैश्यांची देवाण घेवाण करतात असे दिसुन आले.
एकुण ३३ आरोपी मध्ये गुजरात राज्यातील ६, उत्तर प्रदेश राज्यातील ०३, बिहार व मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी १ महाराष्टातील चंद्रपूर, पूणे, मुंबई, अमरावती बुलढाणा येथील ०८ व अकोला जिल्ह्यातील १४ आरोपी आहेत. त्यांचेकडून एकुण १२ Laptop, ११३ मोबाईल, १० बँकेचे Passbook, ०२ पासपोर्ट, १३ ATM कार्ड, Internet Router Airtel, jio चे १२ राउटर व मोडेम, जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहीत्य जप्त करण्यात आले असुन वरील सर्व आरोपी विरुद्ध पो.स्टे. बार्शीटाकळी येथे ६०/२०२५ कलम कलम 318 (4), 112 (2), 3(5) भारतीय न्याय सहीता सहकलम 4, 5 महा. जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने स्थानीक गुन्हे शाखा करीत आहे. एकंदरीत कारवाई दरम्यान मिळालेल्या प्राथमीक माहिती वरून असे दिसुन आले की येवता रोडवरील फार्म हा मालक रविंद्र विष्णुपत पांडे वय ६३ वर्ष रा. कातखेड ता. बार्शिटाकळी जि. अकोला व्यवसाय संचालक वैभव हॉटेल यांनी अवैध जुगार चालविल्या साठी संजय गुप्ता व मोनीश गुप्ता यांना अवैध रितीने जागा उपलब्ध करून दिली होती. मोनिश निरंजन गुप्ता व संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिककर रा. लोहारी ता. अकोट याचे माध्यमातुन अटक आरोपीची टोळी जमवून आरोपीला Mobile, Laptop, Wifi, ची सुविधा तसेच बोगस बैंक अकाउंट उपलब्ध करून दिले.
कार्यपद्धती - सट्टा चालविणारे Telegram, whatsapp Group वरून सट्टा खेळण्यासाठी Web ID उपलब्ध असल्याची जाहीरात करत होतो याद्वारे ग्राहक त्या नंबर वर संपर्क करून Betting Web ID घेवुन सट्टा खेळत होतो.
0 टिप्पण्या