Ticker

6/recent/ticker-posts

केळीवेळी येथे मूकनायक महोत्सव राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण

केळीवेळी येथे मूकनायक महोत्सव राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण 


संपादक प्रकाश पोहरे यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती 
       

                                           
अकोला
३१ जानेवारी १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूकनायक हे पाक्षिक सुरू झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मूकनायक पाक्षिकाचे पहिले संपादकपदाची जबाबदारी आपल्या अकोला जिल्ह्यात केळीवेळी येथे जन्मलेले समाजसुधारक पांडूरंग नंदरामजी भटकर यांना दिली होती. पहिले संपादक आणि डॉ बाबासाहेबांच्या वृत्तपत्राचे ही बाब अकोला जिल्ह्यातील सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अश्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला समर्पित असलेला सन्मानाचा मूकनायक पत्रकार पुरस्कार हा दरवर्षी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण केले जातात.यावर्षी राज्यस्तरीय मान संपादक प्रकाश पोहरे यांना तर जिल्हास्तरीय पुरस्कार शौकत अली मिरसाहेब यांना दिला जाणार आहे.हा मुकनायक पत्रकार पुरस्कार वितरणसोहळा दि. १५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ५ वा. अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे होत आहे. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती यावर्षीचे मूकनायक महोत्सवाचे अध्यक्ष माजी आमदार हरिदास भदे, सम्राट अशोक प्रतिष्टान अध्यक्ष प्रा. विजय आठवले, मुख्य संयोजक मधुसूदन भटकर,,मूकनायक महोत्सव समिती अध्यक्ष अनिल तायडे, पद्माकर वासनीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रामटेक येथील युवकावर प्राण घातक हल्ला
https://www.instagram.com/reel/DF175x0y_xV/?igsh=MW1wbDJqbHk5MWRxZw==
 मुकनायक पत्रकार पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकारांना या मुकनायक महोत्सवात पुरस्कार वितरण केले जाणार असून या मुकनायक महोत्सवाचे उदघाटक राज्यसभा खासदार तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे हे करतील. तर मुख्य अतिथी अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखड़े,हे असतील तर राज्यस्तरीय मूकनायक पुरकाराचे मानकरी दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक लोकनायक प्रकाश पोहरे ,व जिल्हा मूकनायक पुरस्कार शौकत अली मिरसाहेब यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. संतोष हुशे असणार आहेत.मुख्यसंयोजक मधुसूदन भटकर ह्याची विचारपीठावर उपस्थिती असेल.जिल्ह्यातील 
आमदार नितीन देशमुख,आमदार साजिदखान पठाण, दर्यापूरचे आमदार गजानन लवटे,नाशिकचे माजी महापौर, अशोक दिवे, माजी आमदार हरिदास भदे, गजाननराव दाळु गुरूजी, माजीमंत्री गुलाबराव गावंडे, काँग्रेसनेते प्रकाश तायडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर काँग्रेस महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, काँग्रेस नेते महेश गणगणे,शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, काँग्रेस नेते अविनाश देशमुख हेमंत देशमुख,, रमाकांत खेतान, भीमशक्ती चे नेते,दिनकर ओंकार, कैलास सुखदाने शशिकांत बनसोड, एन के कांबळे ,अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत पाचडे, संजय बोडखे, तपस्सू मानकिकर,प्रा. डॉ.बाळकृष्ण खंडारे, भवनसुंदर वानखड़े,.राजूशेठ अग्रवाल,महेंद्र गवई रमेश वानखडे,केळीवेळी ग्राममंडळ अध्यक्ष किशोर बुले,राष्ट्रीय कबड्डी खेळाडू डॉ. राजकुमार बुले,दिनकररावं गावंडे,गौतम उमाळे, डॉ. अशोकराव मोंढे गजाननराव नळे, भीमशक्तीचे जिल्हा नेते रमेश सावळे,किशोर शिरसाट बाळकृष्ण शिरसाट मुकुदराव बकाल भुजीगराव शिवरकार, सम्राट अशोक प्रतिष्ठानचे प्रा डॉ बाळकृष्ण खंडारे प्रा सुनील कांबळे प्रा शैलेश इंगळे ,प्रा. सुभाष दामोदर,अनिल गवई,विद्याधर मोहोड,संदेश गवई इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांच्या मनोगतातून समाजातील ज्वलंत प्रश्नावर वैचारिक मंथन होणार आहे दुसऱ्या सत्रात मूकनायक राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी दैनिक देशोन्नती संपादक प्रकाश पोहरे व जिल्हा मूकनायक पुरस्कार प्राप्त शौकत अली मिरसाहेब यांचा मूकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे,संपूर्ण अकोला जिल्हासाठी भूषणावह असलेल्या या कार्यक्रमासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले आहे तर या कार्यक्रमासाठी देवराव भटकर, भगवान भटकर, दिवाकर सिरसाट, दिलीप ओई्म्बे, शंकरराव इंगळे पाटील, वासुदेवराव साटोटे, दिपकराव साटोटे, कैलास भटकर, विनायक भटकर, दुर्योधन भटकर, वासुदेव शशिकांत गाडे, अनंतराव गावंडे,, प्रमोद पाचकोर, मधुकर सोनोने , प्रेमराज भटकर, प्रशांत भटकर, सावन वानखडे,विशाखा महिला उपासिका संध,केळीवेळी, तक्षशिला उपासक संध नवीन केळीवेळी , रमाबाई महिला उपासिका संघ, रोहणा,
एमाई महिला उपासिका संध, एकलारा, संत कबीर उपासिका संघ,विशाखा उपासिका संघ हीगणी, भीमज्योती उपासिका संघ ,काटी, पाटी उपासक उ्पासिका संध, दोनवाडा , उपासक उपासिका संध, दहीहांडा,उपासक उपासिका संघ, जऊळखेड हनुमान क्रीड़ा व व्यायाम मंडळ, सखाराम महाराज क्रीडा मड़ळ, मूकनायक प्रतिष्ठाण, केळीवेळी इत्यादी व संस्था ,संघ,अथक परिश्रम घेत आहेत.  
 

रात्री भिमदास नाईक आणि संच, नागपूर 
यांचा समाज प्रबोधनाचा दणदणीत कार्यक्रमं होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत मुकनायक महोत्सव मुख्य संयोजक मधुसूदन भटकर,सम्राट अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा विजय आठवले,मूकनायक महोत्सव समिती अध्यक्ष अनिल तायडे, पद्माकर वासनीक इत्यादीनी दिली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या