Ticker

6/recent/ticker-posts

कॅन्सर पेशंट होताहेत कॅन्सर योध्दे, बाळ काळणेंचे प्रबोधन

कॅन्सर पेशंट होताहेत कॅन्सर योध्दे, बाळ काळणेंचे प्रबोधन


महाराष्ट्र - दरवर्षी निघणाऱ्या कॅन्सर प्रबोधन यात्रेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राम शिंदे यांनी केले . सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांनी कॅन्सरचा आघात झेलून कॅन्सरवर मात कशी केली याचे कॅन्सर प्रबोधन यात्रेत ते सकारात्मक मार्गदर्शन करत असतात त्यांचे प्रमुख वाक्य कॅन्सर झाल्यानंतर positive think and challenging work आपण केले तर कॅन्सर आहे हे मनात रुजल्या जात नाही व्यक्ति दिल खुष राहुन औषधीचा परिणाम आपल्यावर अधिक चांगला होतो. निश्चित पणे आजारातुन बाहेर निघणे शक्य होत राहते . अशा रोजचे पाचच्या वर कार्यक्रम घेवुन ही प्रबोधन यात्रा महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात कॅन्सर पेशंट व संपूर्ण समाजात कॅन्सरची भीती नष्ट करीत नवा आशेचा किरण निर्माण करत आहे. विदर्भ , मराठवाडा , खानदेश हया सर्व भागात या पहिले कॅन्सर जनजागृति केली आहे . यावर्षीही पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, कुर्डुवाडी, सोलापुर, पंढरपुर , सांगली, कोल्हापुर , सातारा हया मोठ्या जिल्हात हया यात्रेने कृतिने कॅन्सर प्रबोधन कार्यक्रम करीत आरोग्य क्षेत्रात नाविण्य पुर्ण कार्य केले महाराष्ट्रातील विशेष स्वयंम सेवक हया यात्रेत सहभागी असतात. अकोल्याचे सर्पमित्र बाळ काळणे यांचा कॅन्सरशी लढा व मात हा प्रबोधन यात्रेचा मुख्य गाभा आहे .बाळ काळणे हे कॅन्सर ऑपरेशन मुळे 79% अपंगत्व आल्यावरही सर्पसेवा वन्यजिव सेवा हे धाडसी सुरूच ठेवून समुद्री आत्मविश्वासू महाप्रयोग केले. अशा आरोग्य स्थितीत ते हया सर्वच सेवा करणारे भारतातील व जगातीलही एकमेव सेवक ठरले. कॅन्सर प्रबोधन यात्रेत अशा कार्यासह मार्गदर्शनातुन छाप पाडत संपूर्ण महाराष्ट्रात हे कार्यक्रम होतात. महाविद्यालय , मेडीकल कॉलेज, इंजी कॉलेज , डीफार्म एम फार्म महाविद्यालयात नर्सिंग कॉलेज येथे यावर्षीही हे कार्यक्रम झालेत. प्रत्येक जिल्हातील मा. जिल्हाधिकारी यांना आम्ही व त्या त्या जिल्हातील विद्यार्थी व स्टाप यांनी तिथे जावुन कॅन्सर कशामुळे वाढतो याविषयी प्रथम निवेदन दिले. आरंभ पॅलेटीव्ह केअर सेंटर अहिल्यानगर चे संस्थापक प्रदिप काकडे हे सर्वश्री आयोजक व मार्गदर्शक असतात. यांच्या आयोजनामुळे हे महान कार्य घडत आहे . यात्रेला प्रयास संस्था अमरावती डॉ अविनाश सावजी यांचेही सहकार्य लाभले . हया यात्रा टीम मध्ये डॉक्टर्स , नर्स , आरोग्य एन जी ओ व कॅन्सर वर मात करणारे प्रमुख मार्गदर्शक असतात . बाळ काळणे आपल्या शैलीतून कॅन्सर मार्गदर्शन करत आले. हया क्षेत्रातही महाराष्ट्रासाठी अकोल्याचे व्यक्तिमत्व विशेष सेवेतील प्रमुख भूमिकेत आहे. मागच्या वर्षी जम्मू काश्मिरला बाळ काळणेंचे प्रबोधन झाले. संपूर्ण महाराष्ट्र व देशातील विशेष भागात कॅन्सर प्रबोधन आयोजित होत आहेत. अकोल्यातील बाळ काळणे , व समाधान वानखडे ( आरोळी संस्था) हे देशातील एकमेव अशा कॅन्सर प्रबोधन यात्रेत शामिल होते .

🎗 कॅन्सर प्रबोधन यात्रा २०२५ 🚩
जागतिक कर्करोग दिनानिमित्त आरंभ नगर व प्रयास अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर जनजागृतीसाठी प्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे!

🗓 यात्रेचा मार्ग:
📍 ३ फेब्रुवारी – अहिल्यानगर (सुरुवात)
📍 ३ फेब्रुवारी – कुर्डुवाडी (रात्री मुक्काम)
📍 ४ फेब्रुवारी – सोलापूर (जागतिक कर्करोग दिन सोहळा)
📍 ५ फेब्रुवारी – पंढरपूर (मुक्काम)
📍 ६ फेब्रुवारी – सांगली (मुक्काम)
📍 ७ फेब्रुवारी – कोल्हापूर (मुक्काम)
📍 ८ फेब्रुवारी – सातारा (समारोप)

🚶‍♂️💜 हा प्रवास आरोग्य जनजागृतीसाठी! आपणही यात सहभागी व्हा आणि समाजात कर्करोगविषयी जागरूकता निर्माण करा!


🎗 Cancer Awareness Yatra 2025 🚩
On the occasion of World Cancer Day, Aarambh Nagar and Prayas Amravati are organizing a Cancer Awareness Yatra to spread knowledge and awareness about cancer prevention and treatment!

🗓 Yatra Route:
📍 3rd Feb – Ahilyanagar (Start)
📍 3rd Feb – Kurdwadi (Stay)
📍 4th Feb – Solapur (World Cancer Day Celebration)
📍 5th Feb – Pandharpur (Stay)
📍 6th Feb – Sangli (Stay)
📍 7th Feb – Kolhapur (Stay)
📍 8th Feb – Satara (Conclusion)

🚶‍♂️💜 A journey for health awareness! Join us in spreading the message and making a difference!

#CancerFreeIndia #CancerAwareness #CancerPrevention #WorldCancerDay #PublicHealth #JoinTheMovement #Maharashtra #supportthecause


१.आरंभचा एक संदेश, कॅन्सरमुक्त भारतदेश
२.जोडूया जोडूया,माणूस जोडूया
रोखुया रोखूया, कॅन्सर रोखुया
३.खाऊ नका गुटखा, लागेल जीवनाला झटका


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या