Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील धार्मिक स्थळाच्या विकासासाठी आमदार सावरकर यांचे विशेष प्रयत्न- खा. अनुप धोत्रे

ग्रामीण भागातील धार्मिक स्थळाच्या विकासासाठी आमदार सावरकर यांचे विशेष प्रयत्न-  खा. अनुप धोत्रे


पानेट येथे भाजपचे जेष्ठ नेते, देशाचे माजी मंत्री मा श्री संजय भाऊ धोत्रे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा


विकास कामांचे लोकार्पण, दुग्ध अभिषेक, आरोग्य शिबीर , महाप्रसाद व जल वितरण देशाचे माजी मंत्री भाजपचे जेष्ठ नेते मा संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महाशिवरात्री च्या पावनदिनी तीर्थक्षेत्र पानेट येथे भाजपाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अनुप धोत्रे , आमदार रणधीर सावरकर , सौ मंजुषा सावरकर , सौ धोत्रे यांच्या हस्ते भुराघरातील स्वयंभु महादेवावर दुग्ध अभिषेक करून पूजा अर्चा करण्यात आली. येथे येणाऱ्या भावीकांसाठी आमदार सावरकर यांनी विशेष प्रयत्न करून उभारलेल्या 2 कोटी 48 लक्ष रुपयांच्या भव्य सभागृहाचे व स्वछता गृहाचे रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण ही करण्यात आले. ग्रामीण भागातील धार्मिक स्थळाला भरभरून निधी देऊन त्यांचा अधिक प्रमाणात विकास व्हावा याकडे आमदार रणधीर सावरकर यांचे विशेष लक्ष असल्याचे मत खासदार अनुप धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केले. विकासापासून कोसोदूर राहिलेल्या या संस्थानला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत भक्तांच्या सोयीसाठी अकोला अकोट रोडवरून पानेटला जोडणाऱ्या रस्त्यासाठी तात्काळ 1कोटी 71 लक्ष रुपये मंजूर डांबरीकरन रस्ता करुन दिल्याबद्दल पानेट संस्थानच्या वतीने आमदार सावरकर व खासदार अनुप संजय धोत्रे यांच्या भव्य सत्कार करण्यात आला.


अकोला जिल्ह्यात प्राचीन महत्व प्राप्त असेललं पानेट सारखं एवढं मोठं धार्मिक स्थळ असतानाही प्रकाशझोतात आलं नाही. आणि विकासापासूनही वंचित राहिलं याची खन्त व्यक्त असल्याचे सांगत भाविकांच्या सोयीसाठी मी आमदार झाल्यापासून जवळपास 4 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे याची माहिती देत या पुढेही येथे येणाऱ्या भविकानासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहू अशी ग्वाही आमदार सावरकर यांनी हजारो भाविकाना दिली. महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत औषदोपचार करण्यात आला. तसेच प्रयागराज येथून आणलेल्या जलाचे सुद्धा भाविकांना वितरण करण्यात आले. साबुदाना उसळ वितरित करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, पानेट संस्थांनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या