लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात, पातुर ठाण्यात अकोला एसीबीची कारवाई
पातुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले लाचखोर शिपाई पवन सुनील भाकरे, याला शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजीच्या दुपारी अकोला लाचलुचपत विभागाने तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत दारू विक्रीचा धंदा करणाऱ्या तक्रारदारावर तडीपार एमपीडीए व प्रतिबंधात्मक कारवाई पासून वाचवण्यासाठी लाचखोर पोलीस शिपाई पवन भाकरे यांनी पाच हजार रुपयांची मागणीचा तकादा लावला होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी थेट अकोला एसीबी विभाग गाठले, आणि रीतसर दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजीच्या दुपारी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकार, यांच्या मार्गदर्शनात अमरावती युनिटचे पोलीस निरीक्षक भारत जाधव, यांच्या नेतृत्वात पथकातील भूपेंद्र थोरात, दिगंबर जाधव, संदीप ताले यांनी सापळा रचवून लाचखोर शिपाई पवन भाकरे याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून अटक केली व पातुर पोलीस स्टेशनमध्ये लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पातुर तालुक्यात एकच खडबड उडाली होती.
पातुर तालुक्यात अवैध धंदे थांबता थांबेना
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या काही महिन्यापासून वरली मटका, जुगार अड्डे, देशी व गावठी दारू विक्री, विमल गुटखा विक्री, आदी अवैध धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध धंदे सर्रास सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे सुरू असल्याचे निष्पन्न होत असून, अवैध धंदे थांबता थांबेन असे चित्र आहे.
एसीबीचा ट्रॅप लागताच पोलीस वर्तुळात एकच खडबड
लाचखोर पोलीस शिपाई पवन सुनील भाकरे यांच्यावर एसीबीचा ट्रॅप लागताच पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली होती.
लाचेची मागणी कोणाच्या आदेशाने?
तडीपार प्रतिबंधात्मक आदी गंभीर कारवाई पासून तक्रारदाराला वाचवण्यासाठी पोलीस शिपाईने कोणत्या अधिकाऱ्यांच्या नावावर पैशाची मागणी केली,मिळणारा पैशा कोण कोणाच्या हिश्यावर जाणार होता.या सर्व प्रकरणाची सुद्धा एसीबीकडून चौकशी करण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या