आ. सावरकर यांच्या विशेष निधी अंतर्गत बंधारा बांधकामाचे लोकार्पण
अकोला
ग्रामीण जीवन अस्तव्यस्त करण्याचं काम काँग्रेसने केलं ग्रामीण भागामध्ये दळणवळण तसेच उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली असती तर शहराचे महानगरीकरण झपाट्याने होऊ शकले नसते नागरिकांना अनेक कष्ट सहन करून आपल्या परिवारासाठी शिक्षणासाठी शहरांमध्ये यावे लागते सुविधांसाठी परंतु काँग्रेसने गेल्या पन्नास वर्षांमध्ये विकास कामाला गती न दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकारने विकासासोबत दळणवळण शेतकऱ्यांचा उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने धरणे वेगवेगळे कार्यक्रम राबवून विकास परवाला शीघ्रगती दिल्यामुळे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नियोजनबद्ध गेल्या दहा वर्षांमध्ये विकास करून आमदार रणधीर सावरकर यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण केला ग्रामीण चैतन्य निर्माण करण्याचं काम केलं ग्रामीण जीवन आरोग्यासोबत शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने अनेक योजनेला गती दिली त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी खासदार संजय धोत्रे यांना अभिप्रेत कार्य चालना मिळाल्याचे प्रतिपादन खासदार अनुप सुहासिनी ताई संजय धोत्रे यांनी केले.
आ. रणधीरभाऊ सावरकर यांच्या विशेष निधी अंतर्गत लाखोंडा खुर्द येथे को.प. बंधारा बांधकामाचा लोकार्पण व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ अंतर्गत म्हातोडी-लाखोंडा भूमिपूजन सोहळा खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समस्त गावकरी बंधूंनी केलेल्या सत्काराबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून ग्रामीण विकासासाठी निधी कमी न पडू देण्याचे वचनही सर्व गावकऱ्यांना आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. यावेळी श्री राजेश बेले, श्री अनिल गावंडे, श्री दिनुभाऊ ओळंबे, श्री भरत काळमेघ, श्री वैभव तराळे, श्री शरद तराळे,श्री श्रीकृष्ण झटाले, श्री बाबुलालजी कांगटे, श्री चंदु खडसे,श्री भालचंद्र पागृत, श्री घावट भाऊ,मृद व जलसंधारण विभागा चे श्री वानरे साहेब व श्री विनय भटकर मंचावर उपस्थीत होते. यावेळी दोन्ही नेत्यांची मिरवणूक गावातून काढून मातृ शक्तीने ठिकठिकाणी रांगोळी काढून आशीर्वाद दिले
घरकुल साठी राज्य पातळीवर भव्य दिव्य कार्यक्रम
अकोला
अकोला जिल्ह्यातील एका दिवसात पंधराशे घरकुल मंजूर होऊन 6 00 जणांना मंजुरीचा पत्र तात्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अकोला तालुका अखिल सर्व समाजातील नागरिकांना घरकुल साठी अकोला पंचायत समितीमध्ये 22 फरवरी शनिवार रोजी दुपारी तीन वाजता राज्य पातळीवर भव्य दिव्य कार्यक्रम होऊन जिल्हा स्तरावर पालकमंत्री तर तालुकास्तरावर आमदार तसेच राज्यस्तरावर गृहमंत्री नामदार अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस नामदार अजित दादा पवार नामदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजना दोन चा शुभारंभ होत असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. गृहमंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत महा आवास अभियान २०२४-२८ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा- २ मधील राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र व किमान १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३५ वाजता ठिकाण मुख्य बॅडमिंटन हॉल, श्र शिव छत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे नियोजित आहे.
त्याचदिवशी दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय कार्यक्रमाबरोबरच राज्यातील जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर देखील लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रम अकोला पंचायत समिती जिल्हा परिषद रोड येथे होणार आहे. हा कार्यक्रम मध्ये ग्रामपंचायत यांनी मंजूर केलेली ग्रामसभेमध्ये घरकुल योजना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू असा अभिवचन आमदार रणधीर सावरकर यांनी देऊन घरकुल लाभार्थ्यांनी ग्रामसभेमध्ये अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
राज्यातील जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सविस्तर सूचना दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. आजमितीस प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा- २ मधील १८, २०,४३० लाभार्थ्याना मंजूरी (९२.६%) देण्यात आली असून उर्वरित १,४६,३३७ लाभार्थ्याना मंजूरी देणेची प्रक्रिया सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ मधील राज्यातील किमान १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्याचे प्रस्तावित असून आजमितीस १० लाख पैकी ८,९०,०७५ लाभार्थ्यांचे FTO जनरेट (८९.०%) करण्यात आले असून उर्वरित १,०९,९२५ लाभार्थ्यांचं FTO जनरेट करणेची प्रक्रिया सुरू आहे.
तालुकास्तरीय कार्यक्रम
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या राज्यस्तर कार्यक्रमाच्या साधारणपणे दीड तास अगोदर राज्यातील स तालुकास्तरांवर मा. आमदार यांचे अध्यक्षतेखाली ३०० लाभार्थी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ मधील राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरित करण्यात येणार असून, सदर मंजूरी पत्र Download करण्याची सुविधा NIC च्या मदतीने Awaas sof प्रणालीमध्ये करण्यात आली आहे. तेथून मंजूरी पत्र Download करून लाभार्थी यांना देण्यार्च व्यवस्था करण्यात येणार आहे. घरकुल बांधकामाबाबत उपस्थित लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
, या कार्यक्रमामध्ये लाभार्थी यांना मंजूरी पत्र वितरित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी राज्यस्तरावरील कार्यक्रम पाहण्यासाठी NIC च्या मदतीने VC सुविध उपलब्ध करण्यात येणार असल्याची ही माहिती आमदार सावरकर यांनी दिली.
ग्राम पंचायतस्तरावरील कार्यक्रम
ग्रामपंचायत स्तरावर ८x१० फुट साईजचा फ्लेक्स बोर्ड लावण्यात माहिती देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास्
योजना-ग्रामीण टप्पा २ अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांची नावे नमूद करण्यात येणार आहे. (उदा: जिल्हा, ग्रामपंचायतीचे नाव, लाभार्थ्यांचे नाव, मंजूरी वर्ष, लाभार्थ्याचा आवास ID). तालुका सर्व प्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध पैलू जसे की, घरकुल बांधकाम प्रगतीच्या टप्पा निहाय निर्ध वाटप प्रक्रिया, बांधकाम साहित्याची उपलब्धता, घरकुल बांधकाम आराखडा, इ. बाबत लाभार्थ्यांन प्रशिक्षण देण्यात देण्याचा अभिनव कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. या कार्यक्रमामध्ये लाभार्थी यांना मंजूरी पत्र वितरित करण्यात येऊन. हा कार्यक्रम उत्सव स्वरूपात होईल
जिल्हास्तरीय कार्यक्रम
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या राज्यस्तर कार्यक्रमाच्या साधारणपणे दीड तास अगोदर राज्यातील सर्व जिल्हास्तरांवर मा. पालकमंत्री नामदार आकाश सुनिता ताई भाऊसाहेब फुंडकर यांचे अध्यक्षतेखाली ५०० लाभार्थी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
• घरकुल बांधकामाबाबत उपस्थित लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
• पंचायतस्तरावरील कार्यक्रम
दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या राज्यस्तर कार्यक्रमाच्या साधारणपणे दीड तास अगोदर ग्रामपंचायतस्तरावर संबंधित सरपंच यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करून १०० लाभार्थी / लोकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायतस्तरावर दिसण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्क्रीन, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेटची व्यवस्था करावी, जेणेकरून लाभार्थी व ग्रामस्थांना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. या कामी ग्रामपंचायत / प्राथमिक शाळा/ माध्यमिक शाळा/ प्राथमिक आरोग्य केंद्र / इतर संस्था यांची मदत घेण्यात यावी.
मंजुरी पत्र वितरण व हप्ता वितरण कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी व त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याची प्रत्येक
ग्रामपंचायतीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी.
नियुक्त निरीक्षक यांनी ग्रामपातळीवरील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, कृषीसहाय्यक मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेवीका यांचे बरोबर संबंधीत लाभार्थी व त्यांचे कुटूंब यांच्या उपस्थितीचे नियोजन करावे अशा सूचना शासनाने दिल्या आहेत असे आमदार सावरकर म्हणाले.
ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचा रूपरषा
दुपारी ३.०५ वाजता - लाभार्थी यांचे स्वागत
दुपारी ३.१० वाजता - लाभार्थी यांचे प्रशिक्षण
दुपारी ३.४० वाजता - मान्यवरांचे मार्गदर्शन
सायं. ४.३५ वाजता - राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) पाहणे.
• सायं. ५.५० वाजता - राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाल्यावर जिल्हा स्तर / तालुकास्तर /ग्रामपंचायत स्तराव
लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वाटप.ने
• कार्यक्रम समारोप होणार आहे तरी लाभार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून लखपती दीदी पंतप्रधान आवास योजना ने समाज हित राष्ट्रहित कार्यात सहभागी व्हावा अशी विनंती आमदार सावरकर यांनी केली
गण गण गणात बोते मंत्र कल्याणकारी व गजानन महाराज संस्थान व्यवस्थापन सोबत मानवतेचा कार्य करणारी जागतिक स्तरातील संस्था त्याचे भक्त समाजासाठी दिशादर्शक आमदार सावरकर
अकोला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे माघ वद्य सप्तमी २३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री संत गजानन महाराज हे प्रगटले. दिगंबर अवस्थेत प्रगट झालेल्या या तेजस्वी तरुणाने त्यावेळी आपल्या विक्षिप्त वागणुकीने अनेक चमत्कार दाखविले. नागरिकांनी विक्षिप्त म्हणून या तरुणांकडे दुर्लक्ष केले परंतु त्याची तेजस्वी मुद्रा याची साक्ष देत होती हा तरुण साधू पुरुष असावा. पुढे हा तरुण म्हणजे संत गजानन महाराज म्हणून प्रसिद्धीस पुढे आले.
संत गजानन महाराज यांचा१४७ वा प्रकट दिन आपण साजरा केला. संस्थानाचे व्यवस्थापक स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील, शिव शंकर पाटील यांनी संस्थानाच्या योग्य व्यवस्थापन करून जगात आपलं नाव लौकिक केलं त्यांच्या भक्ताकडून माझा व खासदार धोत्रे सत्कार केला. ही सौभाग्याची बाब असल्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
संत गजानन महाराज मंदिर महातोडी येथे मंदिराच्या विश्वस्तांनी आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे यांचा सत्कार केला त्याप्रसंगी ते बोलत होते.
सतपुरुषाच्या हस्ते झालेला हा सत्कार माझ्या जीवनातील एक भाग्याचा आणि पुण्याचा क्षण मी समजतो.श्री संत गजानन महाराज यांचा गण गण गणात बोते हा मंत्र संपूर्ण देशांमध्ये जपल्या जात आहे याचा दिवसेंदिवस श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शणार्थ येणारा शेगाव येथे येणाऱ्या भक्तगणांवरून लक्षात येतो. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील, शिव शंकर पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार आज हे संत गजानन महाराज संस्थान देशातील सुनियोजित व्यवहारामुळे अग्रगण्य म्हणून प्रसिद्धीस पावलेले संस्थान म्हणून गौरविले जाते . त्यामुळे ठीक ठिकाणी संत गजानन महाराजांची मंदिर आदर्श समाजाला दिशादर्शक ठरत असल्याचेही आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. यावेळी राजेश नागमते, मधुकर पाटकर दत्तू पाटील विवेक भरणे सुधाकर कोठारे सुनील वाहिले नंदकिशोर सरोदे प्रमोद खंडारे मंगेश ताडे सुधाकर गवळी नारायण साबळे गणेश पाक धुणे डॉक्टर चाकोते अनिल इंगळे मंगेश घुले बाळासाहेब घुमाळे शिवशंकर साबळे संदीप अरवत विदेश कोठारे सुनील वाहिले प्रमोद खंडारे पवन वर्मा राजेश बेले संतोष शिवरकर गजानन नले माधव बकाल गोविंद गोयंका गणेश पोटे अनिल गासे आदी प्रामुख्याने उपस्थित होते
टाकळी खुर्द येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार कोल्हापूरी बंधारा : आमदार रणधीर सावरकर
खासदार अनुप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती
या प्रकल्पामुळे परिसरातील हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली येणार टाकळी खुर्द येथे कोल्हापूरी बंधाऱ्याचे काम पूर्ण नंतर हा बंधारा शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारा ठरणार असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.
3 कोटी 50 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्याचे आज शुक्रवार रोजी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न झाले. यावेळी राजेश नागमते, मधुकर पाटकर, दत्तू पाटील गावंडे, सुदाकर खोटरे , सुनील वहिले, नंदकिशोर अरबट, किशोर सरोदे, विवेक भरणे प्रमोद खंडारे, मंगेश ताडे, सुदाकर गवळी, नारायण साबळे, गणेश पागधुणे, डॉ चाकोते, अनिल इंगळे, मंगेश घुले, बाळासाहेब धुमाळे, शिवशंकर साबळे, संदीप अरबट, निलेश खोटरे, सुनील वहिले, प्रमोद खंडारे, चंदू गवळी, उपसरपंच मीना गवळी, सुरेश ताडे, निलेश माटे, प्रतीक पेटे, श्रीकांत गाडेकर, दिलीप सुलताने, निखिल म्हल्ले, अमोल बुंदे, पिंटू पाटकर, बबलू पाटकर, पवन वर्मा, यांच्या टाकळी खुर्द, देवरडा, निजामपूर, पल्लसोड सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते
0 टिप्पण्या