Ticker

6/recent/ticker-posts

विकास कामाचा आढावा घेऊन आमदार सावरकरांचा शेतकऱ्यांशी संवाद

विकास कामाचा आढावा घेऊन आमदार सावरकरांचा शेतकऱ्यांशी संवाद


अकोला 
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांची संवाद गावकऱ्यांची व वेगवेगळ्या समाजातील नागरिकाची सुसंवाद आमदार रणधीर सावरकर साधून समस्या जाणून घेतल्या. विकास कामे साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीचा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दळणवळणाची सोय ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत काम चांगल्या पद्धतीने व्हावे याकडे अधिकाऱ्यांसोबत नागरिकांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे असे यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील अकोट
तालुक्यातील चालू असलेल्या पुंलांचे व रस्त्यांचे कामाची पाहणी करताना व त्या कामात काही तॄट्या व अडचणी आहेत का हे गावकऱ्यांना सुसंवाद व कामाची पाहणी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी केली. नंदिग्राम पुंडा येथे भेटी दरम्यान गावातील प्रमुख लोकांसोबत ग्रामीण भागातील समस्या जाणून घेताना व गावकरी मंडळी सोबत शेती या विषयावर चर्चा करताना आमदार रणधीर भाऊ सावरकर व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या